Tennis Fan Pays Over $85,000 For A Date With Canadian tennis player Eugenie Bouchard svg
Hot and Beauty; 'या' टेनिसपटूसोबत डेटवर जाण्यासाठी चाहत्यानं मोजले चक्क 7 कोटी! By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2020 04:53 PM2020-05-19T16:53:27+5:302020-05-19T16:57:16+5:30Join usJoin usNext जगभरातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येनं सगळ्यांना चिंतेत टाकले आहे. जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा 49 लाख 10,710 इतका झाला आहे. त्यापैकी 19 लाख 19,151 रुग्ण बरे झाले आहेत, परंतु 3 लाख 20,448 जणांना आपले प्राण गमवावे लागले. अमेरिकेत सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. येथील संख्या 15 लाखांच्या वर गेली असून 91 हजारांहून अधिकांचा मृत्यू झाला आहे, तर साडेतीन लाख रुग्ण बरे झाले आहेत. या संकट काळात अमेरिकेतील गरजूंना जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी टेनिसपटू युजेन बुचार्डनं एक अट ठेवली होती. तिनं सोशल मीडियावर एक ऑक्शन पॅकेज टाकला होता. या पॅकेजमध्ये तिनं तिच्यासोबत एक ग्रँड स्लॅम सामना पाहण्यापासून ते डेटवर जाण्याचा पर्याय ठेवला होता. या ऑक्शनसाठी 37 जणांनी बोली लावली आणि त्यातून उभा राहिलेला निधी पाहून बुचार्डलाच आश्चर्याचा धक्का बसला. ऑल चॅलेंज वेबसाईटच्या वृत्तानुसार सर्वाधिक बोली लावणारी व्यक्ती कॅनडाच्या या टेनिस सुंदरीसह अमेरिकन ओपन ते विम्बल्डन मधील कोणताही एक सामना पाहणार आहे आणि तेही एका मित्रासोबत. दोन लाख रुपयांपासून या बोलीला सुरुवात होणार होती. एका चाहत्यानं बुचार्डसोबत डेटवर जाण्यासाठी तब्बल 70 हजार पाऊंड म्हणजे सात कोटींची बोली लावली. हे पैसे ती अमेरिकेच्या फाईव्ह सेकंड फ्रेमला दान करणार आहे. 26 वर्षीय बुचार्ड जागतिक क्रमवारीत 332 क्रमांकावर आहे. पण, तिनं 2014मध्ये विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्याचवर्षी तिनं ऑस्ट्रेलिया आणि फ्रेंच ओपनमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. 2017मध्ये ती अशाच एका चाहत्यासोबत डेटवर गेली होती. त्यानंतर जॉन गेरेके नावाच्या चाहत्यासोबत डेटवर गेली होती. तिच्या सौंदर्याचे जगभरात लाखो चाहते आहेत.टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याअमेरिकाCoronaVirus Positive NewsAmerica