Damage to the salt growers on the west coast bar by the storm of oak storm
ओखी वादळाच्या तडाख्याने पश्चिम किनार पट्टीवरील मिठ उत्पादकांचे नुकसान By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2017 09:42 PM2017-12-10T21:42:55+5:302017-12-10T21:45:57+5:30Join usJoin usNext मीरा रोड -ओखी चक्रीवादळ व अवकाळी पावसाळा मुळे राज्यातील मुंबई, पालघर, ठाणे, रायगड,रत्नागिरी या पाच जिल्ह्यातील मिठ उत्पादकांचे अतोनात नुकसान झाले आहे. साठवून ठेवलेले मीठ तसेच या हंगामामध्ये मिठ उत्पादनासाठी तयार केलेले वाफे, बांध-बंधारे पावसाने धुवून गेले व खराब झाल्याने सुमारे दोन महीने केलेली मेहनत, मजुरी आदी खर्च वाया गेलाय. यंदा मीठ उत्पादनावर देखील याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे . ओखीच्या तडाख्याचा फटका मच्छीमार, शेतकरी यांच्यासह शिलोत्री व मीठ उत्पादकांना देखील बसलाय .