Eknath Shinde: रिक्षावाल्यांकडून एकनाथ शिंदेंचं समर्थन, रिक्षावर दिसला 'लाल दिवा' By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 04:44 PM 2022-07-07T16:44:31+5:30 2022-07-07T16:53:25+5:30
ठाणे महापालिका समोर एकनाथ शिंदे समर्थक रिक्षावाले एकत्र जमले होते. खासदार श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासमेवत येथून रिक्षाचालकांची रॅली काढण्यात आली. राज्याच्या विधानसभेत बहुमत चाचणीत शिंदे सरकारनं यश प्राप्त केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर सर्व पक्षीय नेत्यांची भाषणं झाली.
विविध नेत्यांकडून जोरदार भाषणं झाली. याच दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Shivsena Eknath Shinde) यांनी देखील रोखठोक भाषण केलं आहे.
अन्यायाविरुद्ध बंड करणं ही बाळासाहेबांचीच शिकवण होती. आपण बंड केला नसून उठाव केल्याचं सांगत त्यांनी जोरदार फटकेबाजी केली. तसेच आपला जीवनप्रवासही उलगडला.
एक रिक्षाचालक ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास राहिला आहे. आता, रिक्षाचालकांसाठी त्यांच्याकडे आमदार उदय सामंत यांनी मोठी मागणी केली आहे.
एकनाथ शिंदेंच्या भाषणाची सोशल मीडियामुळे सर्वत्र चर्चा झाली. अनेकांनी शिदेंच्या भाषणाचं कौतुक करत त्यांना दाद दिली. तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर रिक्षावाला म्हणत टीका केली होती.
आता ठाण्यातील रिक्षाचालक एकनाथ शिंदेच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. मी रिक्षावाला, मी मुख्यमंत्री या आशयाचे टि शर्ट परिधान करुन रिक्षावाल्यांनी एकनाथ शिदेंचं समर्थन केलं आहे.
ठाणे महापालिका समोर एकनाथ शिंदे समर्थक रिक्षावाले एकत्र जमले होते. खासदार श्रीकांत शिंदे, माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासमेवत येथून रिक्षाचालकांची रॅली काढण्यात आली.
मी रिक्षावाला, मी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेले टीशर्ट रिक्षाचालकांनी घातले होते. तसेच रिक्षाचे चिन्ह व रिक्षावर लालबत्ती दाखवण्यात आलेली आहे.
दरम्यान, "काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता'' असा टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदेंना लगावला होता. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनीही जोरदार पलटवार केला आहे.