Elphinstone Stampede Accident: Nationalist Congress Party Strikes at Kalwa Railway Station
एलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटना : कळवा रेल्वे स्थानकात राष्ट्रवादी काँग्रेसनं केला रेल रोको By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 12:08 PM2017-10-03T12:08:16+5:302017-10-03T15:05:18+5:30Join usJoin usNext एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेबाबत प्रशासन निषेध नोंदवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं रेल रोको आंदोलन केलं मध्य रेल्वेच्या कळवा रेल्वे स्थानकात राष्ट्रवादी काँग्रेसनं रेल रोको केला आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात हा रेल रोको करण्यात आला कळव्याहून सीएसटीकडे जाणारी 9.09 वाजताची लोकल आंदोलनकर्त्यांनी दोन मिनिटांसाठी रोखली 'नको आम्हाला बुलेट ट्रेन... सुधरवा आमची लोकल ट्रेन', अशी घोषणाबाजी रेल रोकोदरम्यान करण्यात आली आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता चेंगराचेंगरी दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये व बुलेट ट्रेनऐवजी लोकलने प्रवास करणाऱ्यांच्या समस्या सोडवण्याला प्राधान्यक्रम द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस केली आहे 29 सप्टेंबर रोजी एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवर घडलेल्या चेंगराचेंगरीत 23 जणांना आपला जीव गमवावा लागलाटॅग्स :एलफिन्स्टन चेंगराचेंगरीमध्ये रेल्वेभारतीय रेल्वेElphinstone Stampedecentral railwayIndian Railway