शिवसेनेच्या आंदोलनानंतर मीरा रोडच्या शांतीनगरमधील फेरीवाल्यांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 23:00 IST2017-11-06T22:53:21+5:302017-11-06T23:00:02+5:30

मीरा रोडच्या शांती नगरमध्ये भरणारा बेकायदा सोमवार बाजार बंद करण्यासह फेरीवाल्यांना हटवण्यासाठी स्थानिक शिवसेना नगरसेविकेसह शिवसैनिकांनी रात्रीपर्यंत उपोषण केले.

शांतीनगरमधील सेक्टर १, २, ३, ४ व ५ मध्ये आधीच अरुंद रस्ते असताना त्यात फेरीवाले, हातगाडी वाले यांनी रस्ता व फुटपाथवर अतिक्रमण केले आहे.

शांती नगरच्या या मुख्य रहदारीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी होते. वाहन नेण्यास तर सोडाच पण चालणे देखील जिकरीचे बनते.

सेना नगरसेविका दीप्ती भट यांनी देखील पालिकेकडे सातत्याने सोमवार बाजार बंद करण्यासह फेरीवाले हटवून रस्ते, फुटपाथ मोकळे करण्याची मागणी सातत्याने केली होती.

राजू भोईर, हरिश्चंद्र आमगावकर, निलम ढवण, शर्मिला बगाजी ह्या नगरसेवकांसह माजी उपनगराध्यक्ष अरुण कदम, उपजिल्हाप्रमुख शंकर विरकर, उपजिल्हा संघटक स्रेहल सावंत, शहरप्रमुख प्रशांत पालांडे, तेजस बागवे आदींसह शिवसैनिकांनी देखील उपोषणात सहभागी झाले होते.