Historical guns found in Bhiwandi; Enthusiasm among Shiva lovers
भिवंडीत सापडल्या शिवकालीन ऐतिहासिक तोफा; शिवप्रेमींमध्ये उत्साह By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 08:41 PM2020-11-03T20:41:15+5:302020-11-03T20:58:16+5:30Join usJoin usNext नितिन पंडीत (वार्ताहर) भिवंडी ठाणे मार्गावर असलेल्या कशेळी गावातील मैदानात दोन ऐतिहासिक तोफा रविवारी सापडल्या आहेत . या तोफांमुळे भिवंडीतील इतर गावांप्रमाणेच आता कशेळी गावाला देखील ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे . या तोफा मिळाल्यानंतर तालुक्यातील शिवप्रेमींमध्ये आनंदाची एकच लाट उसळली आहे. जयकांत शिक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील शिवज्योत संघटनेचे अध्यक्ष रोशन प्रकाश पाटील, पप्पू पाटील, शुभंकर पाटील, उदय पाटील हे तरुण एकत्र येत त्यांनी शिवज्योत परिवार महाराष्ट्र राज्य हि संघटना स्थापन केली आहे. आज या संघटनेचे ८० हुन अधिक सभासद आहेत. शिव कालीन गड किल्यांच्या इतिहास तरुणांसह नागरिकांना माहित व्हावा तसेच ऐतिहासिक गड किल्ल्यांची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी हि संघटना काम करते . ठाणे जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाला असल्याने या जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा आहे .छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमाखातर शिवज्योत संघटनेचे तरुण जिल्ह्यासह राज्यातील गड किल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत आहेत. भिवंडीतील कशेळी येथील मैदानाच्या मोकळ्या जागेत ऐतिहासिक तोफा असल्याची माहिती इतिहास अभ्यासक जयकांत शिक्रे यांच्या अभ्यासात तसेच रोशन पाटील यांना चर्चेतून माहिती मिळाली होती. शिवज्योतच्या सभासदांनी मागील पंधरा दिवसांपासून कशेळी येथे ऐतिहासिक वस्तूंचा शोध घेण्यास सुरुवात केली असता रविवारी कशेळी येथील छ. शिवाजी महाराज क्रीडांगण येथे असलेल्या दत्त मंदिर व स्मशान भूमीच्या बाजूला सुरुवातीला एक तोफा आढळली. शिवज्योतच्या सभासदांनी अगोदर स्वतःच्या हातांनी व श्रमदानाने हि तोफ बाहेर काढण्यासाठी सकाळी आठ वाजल्या पासून सुरुवात केली होती . हे खोदकाम करतांना शिवज्योतच्या सर्वच सभासदांच्या हाताला अक्षरशः फोड आले होते. मात्र, शिवाजी महाराजांच्या प्रेमाखातर हे सगळे केल्याची प्रतिक्रिया या सभासदांनी दिली आहे. दरम्यान तोफा मोठ्या व मातीत खोलवर असल्याने शेवटी जेसीबी मशीनच्या साहाय्याने दोन तोफा बाहेर काढण्यात आल्या आहेत. तोफा बाहेर निघताच शिवप्रेमींनी एकच जल्लोष साजरा केला. या तोफा ब्रिटिश कालीन असून तोफांवर १७९८ ते १८११ असा उल्लेख असून तोफांवर ब्रिटिश राजमुकुट असल्याने या ब्रिटिश कालीन ताफा असाव्यात ज्यांची लांबी ९ फूट २ इंच व दुसऱ्या तोफेची लांबी ९ फूट ३ इंच आहे. टॅग्स :ठाणेगडछत्रपती शिवाजी महाराजthaneFortShivaji Maharaj