installation ganapati bappa scotland
स्कॉटलंडमध्येही बाप्पाचा गजर By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 11:46 PM2017-09-04T23:46:49+5:302017-09-04T23:53:24+5:30Join usJoin usNext गणपती बाप्पा म्हटले की, सगळ्यांच्याच उत्साहाला उधाण येते, त्यातही महाराष्ट्रीयन माणसाचा उत्साह तर द्विगुणित होतो. स्कॉटलंडमध्ये मराठा मित्र मंडळ एडिनबर (एमएमएम-ई) यांनी यंदा 3 दिवसांचा स्कॉटिश गणेश फेस्टिव्हल - 2017 (एसजीएफ - 2017) साजरा केला. स्कॉटलंडमध्ये मुंबईहून खास इको-फ्रेंडली गणेशाची मूर्ती मागवून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने स्थापना करण्यात आली. तीन दिवसांच्या या उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. शनिवारी संध्याकाळी ‘स्वरयात्रा’ या इंडोस्कॉटिश बँडच्या मदतीने स्थानिक भारतीय गायकांनी आणि कलाकारांनी छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. तीन दिवसांच्या या उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल होती. शनिवारी संध्याकाळी ‘स्वरयात्रा’ या इंडोस्कॉटिश बँडच्या मदतीने स्थानिक भारतीय गायकांनी आणि कलाकारांनी छोटेखानी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला होता. गणपती विसर्जनाची मिरवणूक ही मराठी मंडळ एडिनबराची विशेष ओळख आहे. फुलांनी सजवलेल्या पालखीत श्रींची मूर्ती विराजमान झाली. तेथून ती पोर्टबेलो या समुद्रकिना-यापर्यंत आणून तिचं विसर्जन करण्यात आली. टॅग्स :गणेशोत्सवGaneshotsav