‘जा मुली तू जा दिल्या घरी तू सुखी रहा’, कन्येच्या विवाहानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड भावूक By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 04:57 PM 2021-12-07T16:57:33+5:30 2021-12-07T17:07:01+5:30
Jitendra Awhad News: महाराष्ट्र सरकारमधील गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या जितेंद्र आव्हाड यांची कन्या Natasha Awhad हिचा विवाह एलन पटेल याच्याशी झाला महाराष्ट्र सरकारमधील गृहनिर्माणमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या जितेंद्र आव्हाड यांच्या कन्येचा विवाह सोहळा आज साधेपणाने पार पडला.
जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड हिचा विवाह एलन पटेल याच्याशी झाला. साधेपणाने झालेल्या या विवाहाला काही मोजकी मंडळी उपस्थित होती. (फोटो - विशाल हळदे)
नताशा आव्हाड हिचा विवाह एलन पटेल यांचा विवाह नोंदणी पद्धतीने विशेष मॅरेज अॅक्टनुसार झाला. (फोटो - विशाल हळदे)
त्यानंतर वधु-वरांनी एकमेकांना हार घालत उपस्थित असलेल्या ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले. तसेच शुभेच्छा स्वीकारल्या. (फोटो - विशाल हळदे)
या विवाह सोहळ्याला उपस्थित असलेले नताशा आव्हाड आणि एलन पटेल यांचे नातेवाईक.
दरम्यान, विवाह सोहळ्यानंतर एकुलत्या एक मुलीची पाठवणी करताना जितेंद्र आव्हाड भावूक झाले. त्यांनी विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.
जा मुली तू जा दिल्या घरी तू सुखी रहा ......, बाबुल कि दुआये लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले ..... अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.