ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 5 -‘बॉम्बे हाऊस’ या टाटा समुहाच्या मुख्यालयाबाहेर सायरस मेस्री यांचे फोटो काढण्याऱ्या छायाचित्रकारांना झालेल्या मारहाणप्रकरणी ठाण्यामध्ये पत्रकारांनी निषेध व्यक्त करत निदर्शने केली. या मारहाणीच्या निषेधार्थ ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने ही निदर्शने करण्यात आले. यावेळी पत्रकारांनी टाटा समुहाचे निषेध व्यक्त करणारे फलकदेखील जाळले. टाटा हाऊस येथे सायरस मिस्त्रींच्या पत्रकार परिषदेचे चित्रीकरण करणा-या छायाचित्रकारांना येथील सुरक्षा रक्षकांकडून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली होती. शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास टाटा हाऊसची पत्रकार परिषद पार पडणार होती. या परिषदेला सायरस मिस्त्रींनी हजेरी लावणार असल्याने तेथे पत्रकारांसह छायाचित्रकारांनी हजेरी लावली. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास टाटा हाऊस येथे पोहोचलेल्या मेस्त्रींचे फोटो घेण्यासाठी छायाचित्रकार पुढे सरसावले. याच दरम्यान येथील सुरक्षा रक्षकांना धक्काबुकी झाली. दहा मिनिटानंतर मिस्त्री आतमध्ये निघून गेले. मिस्त्री आत जाताच 15 ते 20 सुरक्षा बाहेर धडकले. त्यांनी धक्काबुकी केली याचा राग धरत छायाचित्रकारांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये छायाचित्रकार अतुल कांबळे, एस एल शांतकुमार आणि अर्जीत सेन जखमी झाले आहेत. तिघांवर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यापैकी कांबळे गंभीर जखमी झाले आहेत. फोटो : विशाल हळदे, ठाणे लोकमत