राज ठाकरेंनी केला कल्याण - डोंबिवलीचा दौरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 17:58 IST2017-10-28T17:55:55+5:302017-10-28T17:58:14+5:30

राज ठाकरेंनी केला कल्याण - डोंबिवलीचा दौरा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे कल्याण डोंबिवलीच्या दौ-यासाठी शुक्रवारी सकाळी डोंबिवलीत दाखल झाले होते. राज ठाकरे यांची डोंबिवलीतील सर्वेश हॉलमध्ये डोंबिवली मनसेचे गटाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष आणि शाखाध्यक्षांच्या अंतर्गत बैठक घेतली.
राज ठाकरेंनी केला कल्याण - डोंबिवलीचा दौरा
मुंबई महापालिकेत घडलेल्या मनसे नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर कल्याणच्या दौ-याला विशेष महत्त्व होते. कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेचे नऊ नगरसेवक आहेत.
राज ठाकरेंनी केला कल्याण - डोंबिवलीचा दौरा
राज ठाकरे यांनी शहरातील विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त पी. वेलारासू यांची कल्याण डोंबिवली महापालिकेत जाऊन भेट घेतली.
राज ठाकरेंनी केला कल्याण - डोंबिवलीचा दौरा
शहरातील विविध मुद्यांवरुन यावेळी राज ठाकरे यांनी आयुक्तांना फैलावर धरले. फेरीवाल्यांवरील कारवाई अधिक परिणामकारकपणे होण्यासाठी आपण स्वतः जातीने लक्ष घातले पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.