मीरा रोड-भाईंदर रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांविरोधात शिवसेनेचे आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 16:49 IST2017-10-02T16:43:35+5:302017-10-02T16:49:59+5:30

एलफिन्स्टन चेंगराचेंगरी दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शिवसेनेनं मीरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानक आणि परिसरातील फेरीवाले हटवण्याची मागणी करत आंदोलन केले
आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वात शिवसैनिक हे आंदोलन केलं
शिवसेनेच्या आंदोलनाची कुणकुण लागल्याने मीरा रोड स्थानक परिसरात एकही फेरीवाला बसला नव्हता
फेरीवाले, बेकायदा पार्किंग हटवण्यासाठी दोन्ही स्टेशन मास्तर व रेल्वे सुरक्षा बलास निवेदन देऊन कारवाईची शिवसेनेनं केली मागणी