डोंबिवलीत स्कूल व्हॅनच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2018 08:45 PM2018-01-14T20:45:41+5:302018-01-14T20:56:28+5:30

डोंबिवलीतील जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक संस्थेच्या वतीने आज सकाळी वाहतूक सुरक्षा सप्ताह अभियानानिमित्त भव्य स्कूल व्हॅन रॅली काढण्यात आली.

या रॅलीत ५० स्कूल बस सहभागी झाल्या होत्या. वाहतूक नियमांचे पालन करण्याचा संदेश रॅलीतून देण्यात आला.

संस्थेच्या तिस-या वर्धापन दिनानिमित्त रॅलीचे आयोजन केले होते. निवासी विभागातील ज्येष्ठ निरूपणकार स्व. नानासाहेब धर्माधिकारी रोडला असलेल्या महावितरण कार्यालयाजवळून या रॅलीला प्रारंभ झाला.

प्रदूषण हा एकविसाव्या शतकातील अपराध आहे. हे पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या हाती लक्षवेधी फलक देण्यात आले होते.

या रॅलीत डोंबिवलीचे माजी शहरप्रमुख, नाशिकचे सह संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, डोंबिवली शहर वाहतूक नियंत्रण उपशाखेचे पोलीस निरीक्षक गोविंदराव गंभीरे, संस्थेचे अध्यक्ष सुदाम जाधव यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.