Mahalaxmi Express : प्रवाशांसाठी NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2019 12:03 PM2019-07-27T12:03:36+5:302019-07-27T16:03:38+5:30

बदलापूर, वांगणी परिसरात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.

रेल्वेरूळ पाण्याखाली गेल्याने महालक्ष्मी एक्स्प्रेस बदलापूर-आणि वांगणी स्थानकांच्यामध्ये अडकली आहे.

ट्रेनमध्ये सुमारे दोन हजार प्रवासी असून, प्रवाशांची सुटका करण्यासाठी एन डी आर एफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी नौदलाची 8 बचाव पथकं, 3 पाणबुड्यांचे पथके आणि एक सी किंग हेलिकॉप्टर रवाना

बदलापूर आणि वांगणीदरम्यान अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून आठ जणांची सुटका करण्यात आली आहे. एनडीआरएफकडून तीन रबरी बोटीतून बचावकार्य सुरू

महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवाशांच्या मदतीसाठी हवाई दलाचे हेलिकॉप्टर रवाना, NDRF कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

महालक्ष्मी एक्स्प्रेस सुरक्षित ठिकाणी उभी असून प्रवाशांनी ट्रेनमधून उतरू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

बदलापूर आणि वांगणीच्या दरम्यान कासगाव जवळ महालक्ष्मी एक्सप्रेस थांबवण्यात आली आहे.

एक्स्प्रेस जवळ चार ते पाच फूट पाणी साचल्याने ही एक्सप्रेस काजगाव जवळील रेल्वे रुळावर उभी करण्यात आली आहे.

रेल्वेमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे.

प्रवाशांसाठी खाद्यपदार्थ आणि इतर जीवनावश्यक वस्तू पाठवण्यात आल्या आहेत.