मी मराठी! कला शिक्षकानं ५ तासांत रेखाटली अमूर्त शैलीत मराठी अक्षरांची विविध रूपे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 04:55 PM2021-02-27T16:55:53+5:302021-02-27T17:02:25+5:30

मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून अमूर्त शैलीत मराठी अक्षरांची विविध रूपे पेपरवर रेखाटण्याचा ठाण्यातील कला शिक्षकाने केला भारत वर्ल्ड रेकॉर्डचा संकल्प.

अमूर्त शैलीत मराठी अक्षरांची विविध रूपे पेपरवर रेखाटण्याचा भारत वर्ल्ड रेकॉर्डचा संकल्प ठाण्यातील कला शिक्षकाने केला.

मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून शनिवारी सकाळी ११ ते दुपारी ४ या पाच तासांत २०० मराठी अक्षरांची वेगवेगळी रूपे शिवसमर्थ विद्यालयाचे कला शिक्षक किशोर बाविस्कर यांनी साकारली.

बाविस्कर हे ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालयात गेली २७ वर्षे चित्रकला हा विषय शिकवीत आहेत. त्यांनी फाईन आर्टमध्ये शिक्षण घेतले आहे. त्यांनी आजच्या वर्ल्ड रेकॉर्डमध्ये मराठी भाषा दिन हे विविध रूपांत लिहिले आहे.

चित्रे त्यांनी पॅलेट नाईफचा वापर करून साकारली आहे तर केवळ अक्षरे लिहिण्यासाठी त्यांक ब्रशचा वापर केला आहे. बारा रंगांच्या रंगसंगतीचा वापर करून अप्रतिम चित्रे त्यांनी रेखाटली आहेत. केवळ २ ते ३ मिनिटांत एक चित्र ते साकारत होते. मराठी भाषा दिनानिमित्त जगावेगळे काही संकल्प करावा म्हणून मी या कलेची निवड केली असे बाविस्कर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.