Thane Thane, Kalyan-Dombivali river drains tumbled, claims of municipal corporation false?
ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीत नाले तुंबलेलेच, महापालिकांचा दावा खोटा? By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2019 12:23 AM2019-06-04T00:23:33+5:302019-06-04T00:25:26+5:30Join usJoin usNext जीवाची काहिली करणाऱ्या उन्हापासून सुटका होण्याचे दिवस जवळ आलेत. पावसाळा लवकरच सुरू होणार असून, त्याअनुषंगाने महापालिकांनी नालेसफाईची कामे युद्धपातळीवर सुरू केली आहेत. बऱ्याच भागांत ही कामे पूर्ण झाल्याचा दावा महापालिकांकडून केला जातो. त्या पार्श्वभूमीवर आमचे छायाचित्रकार आनंद मोरे, रोशन घाडगे, महेश मोरे यांनी ठाण्यासह कल्याण, डोंबिवलीचा आढावा घेतला. नाल्यांची भीषण अवस्था दृष्टीस पडली. कल्याणमधील विठ्ठलवाडी परिसर, बसस्थानक आणि जरीमरी परिसर, डोंबिवलीतील गांधीनगर आणि एमआयडीसी मिलापनगर तसेच ठाण्यातील कामगार हॉस्पिटलनाका, कोरम मॉल, खोपट बसस्थानक, वृंदावन सोसायटीसह मुंब्रा-कौसा येथील गुलाब पार्क, मार्केट परिसरातील नालाही तुंबलेला आढळला. या नाल्यांच्या दुर्गंधीमुळे परिसरातील रहिवाशांचे जगणे असह्य झाले असून, त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.टॅग्स :कल्याणठाणेडोंबिवलीkalyanthanedombivali