The villages near Bhatsa dam are still thirsty
धरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 04:31 PM2018-05-25T16:31:17+5:302018-05-25T16:33:37+5:30Join usJoin usNext मुंबईसारख्या महानगरांची तहान भागवणारी अनेक धरणं आहेत. (सर्व छायाचित्रं - विशाल हळदे) शहापूर तालुक्यातील भातसा धरणातूनही अशाच प्रकारे मुंबईकरांना पाणीपुरवठा होतो. याच धरणाशेजारी असणाऱ्या डोंगरमाथ्यावरील पाड्यांवर राहणा-यांना मात्र घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागते आहे. धरण शेजारी असूनही इथल्या लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. मे महिन्याच्या रखरखत्या उन्हातान्हात या गावांमध्ये येणा-या टँकरचे पाणी मिळवण्यासाठी महिलांसह चिल्ल्यापिल्ल्यांचीही गर्दी होते. घसा कोरडा पडलेल्या विहिरींतील पाषाणात एखादा पाझर फुटेल, या आशेने खोदकाम सुरूच असते. एखाद्या विहिरीत ओंजळभर पाणी दिसले तरी विहिरीत उतरण्याची कसरत दिसते. टॅग्स :ठाणेपाणीthaneWater