10 most beautiful tourist places of afghanistan
अफगाणिस्तानधील दहा विलोभनीय पर्यटनस्थळे! By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 11:12 AM2021-08-31T11:12:52+5:302021-08-31T11:27:17+5:30Join usJoin usNext afghanistan : अफगाणिस्तानमध्येही अनेक निसर्ग सौदर्यांने संपन्न अशी पर्यटनस्थळे आहेत. २० वर्षांच्या संघर्षानंतर अफगाणिस्तानातून अमेरिकेचे सैन्य परतले आहे. त्यामुळे आता अफगाणिस्तावर तालिबानचे पूर्णपणे नियंत्रण असणार आहे. दरम्यान, अफगाणिस्तानचे नाव समोर येताच युद्ध आणि दहशतवाद अशी प्रतिमा लोकांच्या डोळ्यासमोर तयार होते. मात्र, अफगाणिस्तानमध्येही अनेक निसर्ग सौदर्यांने संपन्न अशी पर्यटनस्थळे आहेत. याबद्दल जाणून घेऊया... पामीर पर्वत : मध्य आशियास्थित पामीर पर्वत हा त्याच्या हृदयस्पर्शी सौंदर्यामुळे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणूल ओळखले जाते. हे ठिकाण हिमालय आणि तियान शान, सुलेमान, हिंदू कुश, कुनलुन आणि काराकोरमच्या पर्वतरांगांमध्ये आहे. या सुंदर जागेला एक्सप्लोर करण्यासाठी जगभरातील पर्यटक येथे येतात. बंद-ए-अमीर राष्ट्रीय उद्यान : दुर्गम भागात असल्यामुळे तुम्हाला बंद-ए-अमीर राष्ट्रीय उद्यानात पोहोचणे थोडे कठीण होऊ शकते. अफगाणिस्तानमधील बामियानमधून बंद-ए-अमीर राष्ट्रीय उद्यानात सहजपणे पोहोचता येते. याठिकाणी मिनी व्हॅन आठवड्यातून फक्त दोनदा (गुरुवारी दुपारी आणि शुक्रवारी सकाळी) जातात. बामियानचा बुद्ध : अफगाणिस्तानचा हा मध्यवर्ती भाग म्हणजे बौद्धांचा विस्तार झालेले शहर. बामियानचा बुद्ध हे बहुसांस्कृतिक स्थळ आहे. येथे तुम्हाला चिनी, भारतीय, पर्शियन, ग्रीक आणि तुर्की परंपरांचे एक अनोखे मिलन दिसून येईल. दरम्यान, शहरातील बुद्धाचा विशाल पुतळा आपल्याला आश्चर्यचकित करेल. ब्रोघिल पार्क : हिंदू कुश आणि बदख्शां प्रांतातील वाखन जिल्हा ओलांडताच ब्रोघिल पार्कची उंच शिखरे आपल्या नैसर्गिक सौंदर्याने तुमचे स्वागत करतील. ही शिखरावरून तुम्हाला संपूर्ण शहर पाहता येईल. येथील शांत वातावरण आणि हिरवळ पर्यटकांना आकर्षित करते. ताजिकिस्तानमार्गे वाखन कॉरिडॉरद्वारे ब्रोघिल पार्क जवळ जाणे सोपे आहे. मिनार-ए-जाम : मिनार-ए-जामची ६५ मीटर उंचीची इमारत पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. येथील घुरिद साम्राज्याच्या ऐतिहासिक काळात शहरात बांधण्यात आलेल्या स्मारकांपैकी हे एक स्मारक असल्याचे सांगितले जाते. या ६५ मीटर उंच मिनारवर अद्भुत कोरीव काम पाहता येते. बाग-ए-बाबर : हे ठिकाण अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे आहे. बाग-ए-बाबर हे मुघल शासक बाबर यांनी बांधले होते. अफगाणिस्तानात गेल्यानंतर हे ठिकाण तुम्हाला सर्वात सुखद अनुभव देऊ शकते. हेरात राष्ट्रीय संग्रहालय : अफगाणिस्तानातील हेरात या प्राचीन शहरात एक राष्ट्रीय संग्रहालय देखील आहे. हे संग्रहालय आधी पाडण्यात आले होते, पण नंतर पर्यटकांना अफगाणिस्तानच्या इतिहासाची माहिती समजण्यासाठी त्याची पुनर्रचना करण्यात आली. काला इक्तियारुडी किंवा अलेक्झांडरचा बालेकिल्ला म्हणून याला आधी ओळखले जाते होते. दारुल अमन पॅलेस : अफगाणिस्तानमधील दारुल अमान पॅलेस हे देखील पर्यटकांमध्ये एक प्रसिद्ध ठिकाण आहे. दारुल अमान पॅलेस म्हणजे 'शांततेचे निवासस्थान'. हा पॅलेस युरोपियन शैलीत बांधला गेला होता, जो आता उद्ध्वस्त झाला आहे. पॅलेसचे बांधकाम १९२५ मध्ये सुरू झाले आणि १९२७ मध्ये तयार झाले. हा पॅलेस तत्कालीन शासक अमीर अमानुल्ला खान यांनी बांधला होता. याच्या बांधकामासाठी अमानुल्ला खान यांनी जर्मनी आणि फ्रान्समधील २२ आर्किटेक्ट्सना बोलविले होते. नोशाक पर्वत : नोशाक पर्वत हे अफगाणिस्तानातील बदख्शां प्रांतातील वाखन कॉरिडॉरमध्ये वसलेले एक सुंदर ठिकाण आहे. अफगाणिस्तानमधील हे सर्वात उंच शिखर आहे. हिंदू कुश पर्वतरांगेतील हे दुसरे सर्वात उंच शिखर आहे. त्याची उंची सुमारे २४,००० फूट आहे. ब्लू मॉस्क्यू : अफगाणिस्तानची ब्लू मॉस्क्यू म्हणजेच मशीद ही केवळ धार्मिक स्थळच नाही, तर ती पर्यटकांमध्येही खूप प्रसिद्ध आहे. निळ्या संगमरवरीपासून तयार केलेल्या या मशीदीजवळ पांढऱ्या रंगाची कबुतरे भरपूर आहेत. ही मशीद उत्तर अफगाणिस्तानात आहे. या मशिदीला हजरत अली मजार असेही म्हणतात. टॅग्स :अफगाणिस्तानतालिबानट्रॅव्हल टिप्सAfghanistanTalibanTravel Tips