5 destinations to travel to this spring
Spring Seasonमध्ये फिरण्यासाठी बेस्ट आहेत 'हे' 5 विदेशी डेस्टिनेशन्स By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2019 04:48 PM2019-04-07T16:48:51+5:302019-04-07T16:52:37+5:30Join usJoin usNext स्प्रिंग सीझन म्हणजेच, वसंत ऋतू सुरू झाला आहे. मार्च महिन्यापासून जूनपर्यंत राहणाऱ्या या सीझनमध्ये अनेकजण व्हेकेशन एन्जॉय करण्यासाठी हिरवळ आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या ठिकाणी जातात. तसं तर जगभरामध्ये फिरण्यासाठी अनेक बेस्ट ठिकाणं आहेत. परंतु आज आम्ही तुम्ही स्प्रिंग सीझनमध्ये फिरण्यासाठी बेस्ट विदेशी डेस्टिनेशन्सबाबत सांगणार आहोत. नेदरलॅन्ड्स एप्रिलमध्ये नेदरलॅन्ड्समध्ये पीक ट्यूलिप सीझन आहे. हा काळ पर्यटकांना फिरण्यासाठी बेस्ट समजला जातो. येथे एक बगीचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कलरफूल बल्ब (colorful bulbs) पाहायला मिळतील. या पार्कमध्ये मार्च एन्डिंगपासून एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत पर्यटकांना सात मिलियनपेक्षाही अधिक फूलं पाहण्याची संधी मिळते.रेक्याविक, आइसलॅन्ड रेक्याविक आइसलॅन्ड बेस्ट टूरिस्ट प्लेसेसमधील एक आहे. येथे तुम्हाला अनेक अॅडव्हेंचर्स गोष्टी करता येतील. जसं स्टिमी लॅगून (steaming lagoons), स्कूबा डायविंग, नोर्थ लाइट्स इत्यादी अनेक रोमांचक गोष्टी पाहता येतील.न्यूयॉर्क सिटी, न्यूयॉर्क थंडीमध्ये बर्फाने आच्छादलेले आणि उन्हाळ्यामध्ये Swelteringly Hot राहणारं हे शहर सिटी स्प्रिंग सीझनमध्ये फिरण्यासाठी बेस्ट आहे. हे तुम्हाला अनेक सुंदर दृश्यांसोबत क्लबिंग आणि येथील रेस्टॉरंट्समध्ये वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी देतो. माल्टा माल्टाचे छोटे द्वीप आणि येथील मध्ययुगीन कस्बो, प्राचीन मंदरं आणि द्राक्षांच्या मळ्यांमध्ये पर्यटकांना फिरण्यासाठी जूनचा महिना बेस्ट आहे. स्प्रिंग सीझनमध्ये येथे अनेक पर्यटक येत असतात. मार्राकेश, मोरक्को उन्हाळ्यामध्ये वाळवंटातील उन अगदी नकोसं करतं. पण मर्राकेशमध्ये फिरण्यासाठी एप्रिल आणि मे अगदी उत्तम ठरतो. तुम्ही येथे अनेक ठिकाणांना भेट देऊन वाळवंटातील ठिकाणांचा आनंद घेऊ शकता. टॅग्स :ट्रॅव्हल टिप्सपर्यटनTravel Tipstourism