All you need to know about hornbill festival
परदेशातही ख्याती असलेला नागालॅंडचा 'हॉर्नबिल फेस्टिव्हल'! By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 01:45 PM2018-11-26T13:45:58+5:302018-11-26T14:04:20+5:30Join usJoin usNext नागालॅंडची खास जीवनशैली जाणून घेण्यासोबतच फिरण्याचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल तर येथे होणारा हॉर्नबिल फेस्टिव्हल हा सर्वात चांगला इव्हेंट आहे. हॉर्नबिल हा नागालॅंडमध्ये पूजला जाणारा पक्षी असून या फेस्टिव्हलमध्ये लोकगीत, लोकनृत्य आणि नाट्याविष्कार बघता येऊ शकतात. दरवर्षी हा फेस्टिव्हल डिसेंबर महिन्याच्या १ ते १० तारखेदरम्यान साजरा केला जातो. यासाठी देश-विदेशातून पर्यटक मोठी गर्दी करत असतात. तुम्हीही फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर या ठिकाणी भेट देऊ शकता. हा फेस्टिव्हल नागालॅंडची राजधानी कोहिमापासून १२ किमी असलेल्या नागा हेरिटेज गावात साजरा केला जातो. सकाळी ९ वाजेपासून याला सुरुवात होते. या सहभागी होण्यासाठी तुम्हाला तिकीट खरेदी करावं लागेल. नागालॅंड सरकारकडून दरवर्षी या फेस्टिव्हलचं आयोजन केलं जातं. त्यात येथील ग्रामीण संस्कृती, रुढी-परंपरा आणि कलात्मक गोष्टी बघायला मिळतात. लोकनृत्य, लोकगीते, वेगवेगळ्या कलाकृतींची प्रदर्शने या फेस्टिव्हलचं आकर्षण असतात. तसेच इथे लोकल फूडचाही आनंद तुम्ही घेऊ शकता. सायंकाळी हॉर्नबिल रॉक कॉन्सर्टने संपूर्ण नागालॅंड जल्लोषात असतं. यात देश-विदेशातील लोक सहभागी होतात. ही सासंकाळ फार रोमांचक आणि आनंद देणारी ठरु शकते. (Image Credit : www.festivalsherpa.com) १) भारतातील वेगवेगळ्या खास फेस्टिव्हलमध्ये हॉर्नबिल फेस्टिव्हलचा समावेश होतो. हा फेस्टिव्हलसाठी देशातून आणि परदेशातूनही अनेक लोक येतात. त्यामुळे यासाठी आधीच बुकींग करुन ठेवली तर तुम्हाला संधी मिळेल. (Image Credit : www.festivalsherpa.com) या फेस्टिव्हलमध्ये खरेदी करण्यासाठी कितीतरी वस्तू असतात. त्यामुळे खरेदीचा मूड असेल तर सोबत कॅश ठेवायला विसरु नका. प्रत्येक स्टॉलवर भाव करुन तुम्ही वस्तूंची खरेदी करु शकता. (Image Credit : f5escapes.com) ३) परदेशी पर्यटकांना कोणत्याही वेगळ्या परवानगीची गरज नसते. (Image Credit : The Morung Express) ४) फेस्टिव्हलसोबतच आजूबाजूला फिरण्यासाठी तुम्हाला अनेक ठिकाणे आहेत. प्लॅनिंग करुन तुम्ही फिरण्याचाही आनंद घेऊ शकता. (Image Credit : YouTube) हवाई मार्ग - कोलकाता किंवा दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचून तुम्हाला दीमापूरची फ्लाइट घ्यावी लागेल. येथून तुम्ही टॅक्सी किंवा कॅबने कोहिमा पोहोचू शकता. तसेच इथे हेलीकॉप्टरची सुविधाही उपलब्ध असते. रेल्वे मार्ग - येथून सर्वात जवळचं रेल्वे स्टेशन दीमापूरला आहे. हे येथून ७४ किमी अंतरावर आहे. दीमापूर येथून तुम्ही टॅक्सीन कोहिमाला पोहोचू शकता. रस्ते मार्ग - मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मणिपूरहून कोहिमाला पोहोचण्यासाठी NH39 ने जाऊ शकता. (Image Credit : HelloTravel) टॅग्स :पर्यटनtourism