awesome facts about dangerous pamban bridge rameshwaram rail route of india
'हा' आहे 100 वर्ष जुना पूल; शाहरुखच्या प्रसिद्ध चित्रपटाचंही झालंय शुटिंग By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2019 01:39 PM2019-09-14T13:39:00+5:302019-09-14T13:46:10+5:30Join usJoin usNext पांबन पूल हा भारताच्या तमिळनाडू राज्याच्या रामनाथपुरम जिल्ह्यामधील एक सागरी रेल्वे पूल आहे. 6,776 फूट लांबीचा हा पूल रामेश्वरम द्वीपाला मुख्य भारतीय भूमीसोबत जोडतो. 24 फेब्रुवारी 1914 मध्ये वाहतुकीस खुला केला गेलेला पांबन रेल्वे पूल भारतामधील सर्वात पहिला सागरी पूल आहे. मुंबईमधील वांद्रे-वरळी सागरी महामार्ग बांधून पूर्ण होण्याअगोदर हा पूल देशातील सर्वात लांब सागरी पूल होता. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले रामेश्वरम गावामध्ये फक्त या पुलाद्वारेच प्रवेश शक्य आहे. रेल्वेवाहतूकीसाठी एक व मोटार वाहतूकीसाठी एक असे दोन वेगळे पूल अस्तित्वात असून दोन्ही पुलांना एकत्रितपणे पांबन पूल असेच म्हटले जाते. जुन्या पुलाच्या शेजारी 1988 साली मोटार वाहतूक पूल बांधला गेला जो रेल्वे पूलाला पूर्णपणे समांतर धावतो. अभिनेता शाहरूख खानच्या 'चेन्नई एक्स्प्रेस' या चित्रपटातील एका सीनचं शुटिंग देखील याच पुलावर करण्यात आलं आहे. पांबन पुलांचं बांधकाम ब्रिटीश रेल्वेने 1885 मध्ये सुरू केले होते. तर 1914 मध्ये या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले. हा 100 वर्ष जुना पूल आहे 1914 ते 1964 सालापर्यंत चेन्नईच्या इग्मोर स्थानकापासून रामेश्वरम बेटाच्या धनुषकोडी या गावापर्यंत मीटर गेज रेल्वे धावत असे. टॅग्स :ट्रॅव्हल टिप्सतामिळनाडूTravel TipsTamilnadu