Beautiful beaches around hyderabad a perfect getaway with friends and family
हैद्राबादमधील 'या' समुद्रकिनाऱ्यांची बातच न्यारी... By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 05:27 PM2019-02-18T17:27:35+5:302019-02-18T17:35:11+5:30Join usJoin usNext भारतामध्ये खूप सारे समुद्रकिनारे आहेत; पण सौंदर्याच्या बाबतीत हैद्राबादचे बीचेसची बात काही औरच... हैद्राबादमध्ये अनेक सुंदर समुद्रकिनारे आहेत. जिथे तुम्हाला शांतता आणि एकांत अनुभवता येईल. तसेच येथील सौंदर्य न्हाहाळताना तुम्हाला प्रसन्न झाल्यासारखे वाटेल. जाणून घेऊया हैद्राबादमध्ये असलेल्या सुंदर समुद्रकिनारे आणि त्यांच्या वैशिष्ट्यांबाबत..... सूर्यलंका बीच आंध्रप्रदेशमधील गुंटूर जिल्ह्यात स्थित सूर्यलंका बीच टूरिस्ट लोकांसाठी पॉप्युलर आहे. आणि दरवर्षी येथे अनेक पर्यटक येथे भेट देण्यासाठी येत असतात. हा बीच हैद्राबादपासून 319 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. फॅमिली आणि मित्रमंडळींसोबत सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी एकदम परफेक्ट डेस्टिनेश आहे. नव्हेंबरपासून डिसेंबरपर्यंत येथे डॉल्फिन पाहता येतात. मछलीपटनम बीच सौंदर्याच्याबाबतीत या समुद्रकिनाऱ्याला तोड नाही. वीकेंड सेलिब्रेट करण्यासाठी हिल स्टेशन किंवा एखाद्या लांबच्या ठिकाणी जाण्याचा प्लॅन करण्याऐवजी मछलीपटनम बीचवर फिरण्याचा प्लॅन करू शकता. कृष्णा डेल्टाजवळ असलेला हा समुद्रकिनारा निसर्गाचं एक अलौकिक दर्शन घडवतो. येथे तुम्ही एखादी फिशिंग बोट रेंटवर घेऊन येथे फिरण्याचा आनंद द्विगुणित करू शकता. यनम बीच गोदावरी आणि कोरिया नदीच्या संगमावर स्थित असलेल्या यनम बीच तेथील शांततेसाठी प्रसिद्ध आहे. जेव्हा उन्हाची सोनेरी किरणं समुद्राच्या निळ्याशार पाण्यावर पडतात त्यावेळी दिसणारं दृश्य हे डोळ्यांमध्ये साठवून ठेवण्यासारखं असतं. या समुद्रकिनाऱ्याच्या समोरचं जीजस, भारत माता आणि भगवान शंकराची मूर्ती आहे. याव्यतिरिक्त हत्तींच्याही मूर्ती आहेत. येथे असणारं विशाल शिवलिंग आकर्षणाचं केंद्र आहे. यनम बीचला राजीव गांधी बीच म्हणूनही ओळखला जातो. उपाडा बीच हा समुद्रकिनारा चमकणाऱ्या पांढऱ्या वाळूसोबतच लांब किनारे आणि स्वच्छ पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. या समुद्रकिनाऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे, येथे फिरण्याव्यतिरिक्त तुम्ही फुटबॉल, क्रिकेटही खेळू शकता. एवढचं नाही तर जॉगिंगही करू शकता. येथे फिशिंग करण्याचाही आनंद तुम्ह घेऊ शकता. यासाठी फिशिंग बोट रेंटवर घेऊन समुद्रामध्ये फिशिंग करण्याचा आनंद घेऊ शकता. टॅग्स :ट्रॅव्हल टिप्सपर्यटनTravel Tipstourism