the beautiful restaurant made in the sea cave
समुद्राच्या मध्यभागी गुहेतलं हे रेस्टॉरंट पाहिलंय का? By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 03:51 PM2018-07-23T15:51:46+5:302018-07-23T15:57:16+5:30Join usJoin usNext अनेक रेस्टॉरंट असे आहेत जे आपल्या सौंदर्यासाठी आणि वेगळेपणासाठी ओळखले जातात. पण आज ज्या रेस्टॉरंटबाबत सांगणार आहोत ते रेस्टॉरंट समुद्राच्या मध्यावर असलेल्या गुहेमध्ये आहे. हे रेस्टॉरंट इटलीमध्ये असून तुम्हाला भटकंती करण्याची आणि नवख्या जागांना भेट देण्याची आवड असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट द्या. हे रेस्टॉरंट साउथ इटलीमध्ये असून याचे नाव Grotta Palazzese असे आहे. इथे थांबण्यासाठी आणि येथील सौंदर्याची मजा लूटण्यासाठी अनेक पर्यटक येतात. समुद्राच्या मध्यभागी असलेल्या गुहेतील या रेस्टॉरंटमध्ये कपल्ससाठी एक खास डान्स शो ठेवण्यात येतो. या डान्स शोमध्ये सहभागी होण्यासाठी दरवर्षी जगभरातील पर्यटक येतात. या रेस्टॉरंटमध्ये जाऊन तुम्ही तिथल्या स्पेशल पदार्थांचा आणि सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकता. टॅग्स :प्रवासTravel