This is a beautiful village on Bharat Bhutan border
हे आहे भारत-भूतान सीमेवरचे सुंदर गाव By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 05:21 PM2018-11-22T17:21:20+5:302018-11-22T17:43:11+5:30Join usJoin usNext भारताच्या शेजारील देशांपैकी भूतान हा देश सृष्टीसौंदर्याने नटलेला आहे. येथील प्राचीन आणि ऐतिहासिक इमारती सुंदर आहेत. अशा या भूतानमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतातील तितक्याच सुंदर गावातून जावे लागते. या सुंदर गावाचं नाव आहे दोआर. या गावाला भारत आणि भूतान सीमेवरील शेवटचे गाव मानले जाते कारण इथून पुढे भूतानची सीमा सुरू होते. या ठिकाणी भारत आणि भूतान सीमेवर एक द्वार बनवण्यात आले आहे. त्यामुळे या गावाचे नाव दोआर असे पडले. रस्ते मार्गाने भूतानमध्ये जाणाऱ्यांसाठी दोआर हे प्रवेशव्दारासारखे आहे. दोआर हे हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले आहे. पर्वतीय भाग असल्याने येथे अधूनमधून पाऊस पडत असतो. पर्यटकांना वन्यजीव पाहता यावेत यासाठी येथे एक अभयारण्यही बनवण्यात आले आहे. येथे विविध प्रकारच्या वन्यजीवांचे वास्तव्य असून, युनेस्कोने या अभयारण्याचा जागतिक वारशांमध्ये समावेश केला आहे. दोआर येथून संकोस नदी वाहते. या नदीमुळे दोआरचे दोन भागात विभाजन झाले आहे. या नदीमध्ये तुम्ही रिव्हर राफ्टिंगचा आनंदही घेऊ शकता. दोआरला येण्यासाठी गोहाटी आणि बागडोगरा हे नजीकचे विमानतळ आहेत. तसेच येथे येण्यासाठी जलपैगुडी आणि कुचबिहार स्थानकांमधून ट्रेनसुद्धा उपलब्ध आहेत. टॅग्स :पर्यटनपश्चिम बंगालभूतानtourismwest bengalBhutan