The beauty of kerala in Devbhumi has impressed tourists
देवभूमीतल्या 'पूर्व वेनिस’चं सौंदर्य पर्यटकांना घालतंय भुरळ By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 04:53 PM2019-11-26T16:53:55+5:302019-11-26T16:58:41+5:30Join usJoin usNext केरळला देवभूमीसुद्धा म्हटलं जातं. केरळमधल्या निसर्गरम्य ठिकाणं ही कायमच भुरळ घालतात. पर्यटनासाठी केरळ हे बेस्ट डेस्टिनेशन आहे. केरळमधलं अलप्पुझा हे ठिकाणही खास आहे. केरळच्या समुद्री इतिहासात अलप्पुझा या ठिकाणाचा एक विशेष महत्त्व आहे. नैसर्गिक सौंदर्यमुळे या ठिकाणाला पूर्वकडचा वेनिस असंही संबोधलं जातं. अलप्पुझा बोट रेस, बॅकवॉटरमध्ये सुट्ट्या घालवण्यासाठी प्रसिद्ध आहे. इथे मनमुराद समुद्र सफारीही करता येते. अलप्पुझा समुद्र किनारा हा पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. अलप्पुझा विजया समुद्र किनाऱ्यावर एक लाइट हाऊस आहे. तो पर्यटकांना सदोदित आकर्षिक करतो.