Car Free Cities From Around The World
दिवसरात्र कारचं स्वप्न बघणाऱ्यांनो एक नजर या Car Free झालेल्या शहरांवरही टाका! By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 04:04 PM2018-09-25T16:04:53+5:302018-09-25T16:25:13+5:30Join usJoin usNext जगातल्या विविध शहरांमध्ये दिवसेंदिवस कारची संख्या वाढत आहे. याने ट्रॅफिक जॅम आणि पार्किंगचीही समस्या वाढली आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरु शहरात तर पार्किंगसाठी मारझोडही होते. याचा परिणाम शहरांमध्ये प्रदुषण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. इतक्या समस्या वाढूनही लोकांची कारबाबतची क्रेझ काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. दुसरीकडे जगात असेही काही शहरं आहेत जिथे लोक कारशिवायही चांगलं लाइफ जगत आहेत. या शहरांनी कार्सना नेहमीसाठी गुडबाय केलाय. (Image Credit : YouTube) स्वित्झर्लंडमधील Zermatt शहरात कारवर बंदी आहे. त्यामुळे इथे लोक प्रवासासाठी Cable Cars, बस आणि घोडागाडींचा वापर करतात. त्यामुळे या शहरातील हवा इतकी शुद्ध आहे की, येथील हवा दुसऱ्या देशांना $167 प्रति लिटरने विकली जात आहे. (Image Credit : www.gotozermatt.com) Centro Storico हे शहर वेनिसमधील मोठं कार फ्री झोन आहे. इथे एका जागेवरुन दुसऱ्या जागी जाण्यासाठी नावेचा वापर केला जातो. त्यामुळे या शहराला 'The Floating City' असं म्हटलं जातं. (Image Credit : www.azamaraclubcruises.com) अमेरिकेच्या अलास्कामधील Halibut Cove या शहरातील जास्तीत जास्त इमारती पिलर्सच्या सहायाने जमिनीच्या वर काही अंतरावर उभारण्यात आल्या आहेत. चारही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या या शहरात लोक पायी किंवा बोटच्या माध्यमातून प्रवास करतात. खास गोष्ट म्हणजे येथील पोस्ट ऑफिस अमेरिकेतील एकमात्र तरंगतं पोस्ट ऑफिस आहे. (Image Credit : www.halibutcovelive.com) नेदरलॅंडमधील Giethoorn या शहराला 'Little Venice' किंवा नेदरलॅंडचं वेनिसही म्हटलं जातं. या शहरात पूर्वीपासूनच पक्के रस्ते नव्हते. त्यामुळे वाहतुकीसाठी बोट्सचा वापर केला जात होता. काही वर्षांपूर्वी सायकलसाठी ट्रॅक्स तयार करण्यात आले आहेत. पण तिथपर्यंतही नावेच्या माध्यमातून जावं लागतं. १८ व्या शतकातील या शहरात आजही लोक आरामात राहत आहेत. (Image Credit : www.203challenges.com) मेस्किकोमधील Yelapa हे बीच व्हिलेज जगातल्या ७व्या सर्वात मोठ्या खाडीमध्ये स्थित आहे. Puerto Vallarta हून इथे नावेने पोहोचता येतं. या शहराच्या आत वाहतुकीसाठी कोणतही आधुनिक साधन नाहीये. त्यामुळे येथील वातावरण प्रदुषण मुक्त आहे. (Image Credit : www.massageabroad.com) मोरोक्कोमधील Fes el Bali या शहराची लोकसंख्या 1,56,000 आहे. हे शहर जगातलं सर्वात मोठं कार फ्री अर्बन एरिया आहे. हे शहर आपल्या प्राचीन संस्कृतीसाठी आणि लहान गल्ल्यांमुळे कार फ्री झालं होतं. जगातली सर्वात प्राचीन यूनिव्हर्सिटी University Of Al-Karaouine इथेच आहे. (Image Credit : www.planetware.com) ग्रीसमधील Hydra, Saronic Islands च्या या शहरात केवळ ट्रक हेच वाहतुकीसाठीचं साधन आहे. त्यासोबतच इथे घोडे आणि वॉटर टॅक्सीज वाहतुकीसाठी वापरल्या जातात. हे शहर खूप लहान आहे. त्यामुळे या शहरातील लोक पायीच जास्त चालतात. (Image Credit : signaturegreece.com) मिशिगनमधील Mackinac Island इथे केवळ सायरल आणि घोडागाडी हेच वाहतुकीचं साधन आहे. १८९८ मध्ये इथे मोटारवर चालणाऱ्या वाहनांवर बंदी घालण्यात आली होती. (Image Credit :www.twotravellingtoques.com) Fire Island हे अमेरिकेमध्ये प्रवेश करण्यासाठीचं आणखी एक शहर आहे. या शहरात छोटी छोटी घरे आणि सुंदर गल्ल्या आहेत. या शहरात तुम्हाला एकही कार दिसणार नाही. हे आयलंड आपल्या म्युझिकसाठी आणि फूडसाठी प्रसिद्ध आहे. या शहरातील काही परिसरात सायकल चालवण्याची परवानगी आहे. (Image Credit : www.trover.com)टॅग्स :पर्यटनआंतरराष्ट्रीयtourismInternational