Cleanest Beaches : भारतातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ समुद्रकिनारे! By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 04:54 PM 2020-12-18T16:54:57+5:30 2020-12-18T17:01:17+5:30
सुट्ट्यांचा हंगाम सुरू होणार आहे. बर्याच लोकांना आपली सुट्टी निवांत, स्वच्छ आणि सुंदर ठिकाणी घालवायची असते. तुम्हाला जर भारतातील काही बीचवर फिरायचं असेल तर आम्ही तुम्हाला अशाच काही बीचविषयी माहिती देत आहोत, जे स्वच्छतेसाठी परिचित आहेत. तसेच, ते पर्यटकांच्या आवडीचे आहेत.
अगोंडा बीच - अगोंडा बीच हे दक्षिण गोव्यातील एक छोटेसे गाव आहे. हा भारतातील सर्वात सुरक्षित आणि स्वच्छ बीचपैकी एक आहे. येथे रंगीबेरंगी समुद्रकिनारी शॅक्स, शाकाहारी रेस्टॉरंट्स आणि बुटीक रिसॉर्ट्स आहेत. लोक याठिकाणी पोहण्याचा आनंद घेण्यासाठीही येतात.
अलेप्पी बीच - केरळमधील अलेप्पी बीच बरीच वर्षे जुना आहे. येथील सर्वात महत्वाचे आकर्षण म्हणजे समुद्रकाठी असलेले पाम वृक्ष. सूर्यास्ताच्या वेळी या बीचचे सौंदर्य आणखी वाढवते.
पदुबिद्री बीच - पादुबिद्री हे कर्नाटकातील उडुपीपासून 24 किमी अंतरावर एक लहान शहर आहे. पादुबिद्री बीच हा राज्यातील दोन प्रसिद्ध बीचपैकी एक आहे, ज्याला ब्लू फ्लॅग सर्टिफिकेट मिळाले आहे. पर्यटकांसाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा येथे आहेत.
पालोलेम बीच - गोव्यातील पालोलेम बीच आपल्या स्वच्छ आणि मनोरंजक रात्रींसाठी ओळखला जातो. येथील सायलेंट डिस्को देखील खूप लोकप्रिय आहे. तसेच, विशेष म्हणजे बीचवरील शांतता राखण्यासाठी लोक हेडफोन्स घालून जातात. पर्यटकांना समुद्र किनाऱ्यावर राहाण्यासाठी येथे रंगीबेरंगी झोपडीसारखी घरे बांधली आहेत जी खूप सुंदर दिसत आहेत.
राधानगर बीच - अंदमान बेटातील राधानगर बीच हा जगातील सर्वोत्तम बीच मानला जातो. पांढऱ्या वाळूवर मध्यभागी स्पष्ट निळे पाणी आणि दुसर्या बाजूला असलेल्या जंगलाचे सुंदर दृश्य पाहण्यात तुम्ही आपला संपूर्ण दिवस घालवू शकता. दरम्यान, लाटा अगदी उंच जात नाहीत, म्हणून लोकही यामध्ये पोहतात.