Coonoor is the best destination for work experience
कामाच्या धकाधकीतून विरंगुळ्यासाठी कुन्नूर आहे बेस्ट डेस्टिनेशन By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 03:27 PM2019-04-26T15:27:25+5:302019-04-26T15:29:33+5:30Join usJoin usNext नीलगिरी माऊंटन रेल्वे- तामिळनाडूमध्ये कुन्नूरहून ऊटीपर्यंत चालणाऱ्या टॉय ट्रेनमधून निसर्गाचं अद्भुत सौंदर्य पाहायला मिळतं. ही ट्रेन डोंगर रांगातून जात असून, निसर्गाचं विलोभनीय दृश्य नजरेस पडतं. डॉल्फिन्स नोज- कुन्नूर प्रसिद्ध पर्यटनस्थळापैकी एक आहे. मुख्य शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. दाट जंगल, हिरवळ आणि डोंगरातील नयनरम्य चित्र इथे दिसून येते. लेडी कॅनिंग्स सीट- नीलगिरीच्या डोंगरांमध्येही सुंदर नजारे पाहायला मिळतात. इथे चहाचे मोठ मोठे मळे आहेत. जिथे तुम्हाला बऱ्यापैकी हिरवळ दिसते. इथे आपल्याला शांती मिळेल. शहरातल्या धकाधकीच्या जीवनात थोड्याशा विरंगुळ्यासाठी हे ठिकाण बेस्ट आहे. राली बांध- ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी हे ठिकाण बेस्ट आहे. इथे येण्यासाठी जंगलातून मार्गक्रमण करावं लागतं. त्यामुळे निसर्गाच्या अलौकिक सौंदर्याची झलक पाहायला मिळते. सिम्स पार्क- कुन्नूरचे प्रसिद्ध टुरिस्ट स्पॉटमधील एक सिम्स पार्कमध्ये प्रसिद्ध बॉटेनिकल गार्डन आहे. इथे आपल्याला फार सुंदर फुलं दिसतात. 12 एकरमध्ये हे गार्डन पसरलेलं आहे. सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे गार्डन खुलं असतं. टॅग्स :ट्रॅव्हल टिप्सTravel Tips