Destinations in india where indians are not allowed
भारतातील 'या' ठिकाणांवर जायला भारतीयांनाच नो एन्ट्री.... By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 05:23 PM2020-01-30T17:23:17+5:302020-01-30T17:57:42+5:30Join usJoin usNext भारताच्या संविधानाने आपल्याला भारतात सगळ्या ठिकाणी फिरण्याचं स्वातंत्र्य जरी दिले असले. तरी भारतीयांना काही ठिकाणी फिरण्यासाठी बंदी आहे. आज आम्ही तुम्हाला अशा ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. हा कॅफे हिमाचल प्रदेश येथे आहे. पर्यटन स्थळ असलेल्या कसोल येथे हे स्थळ आहे सगळ्यात जास्त इज्राईलचे पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात. या ठिकाणी भारतीय पर्यटकांना जाण्यास मज्जाव आहे. आंध्रप्रदेशातील मोजावे या रेस्टॉरंटमध्ये भारतींयांना प्रवेश बंदी आहे. दक्षिण कोरीयाई पर्यटक फक्त जाऊ शकतात. गोव्याप्रमाणे पद्दुचेरी येथिल बीचवर परदेशी महिलांसोबत गैरवर्तन केले जाऊ नये. म्हणून काही बीचवर भारतीयांना जाण्यास मज्जाव आहे. चेन्नईमधील मंडावेली या ठिकाणी असलेल्या रेड लॉलीपॉप या हॉस्टेलमध्ये फक्त परदेशी पर्यटकांना जाण्यास परवानगी आहे. बॅंगलोर मध्ये असलेले एक हॉटेल २०१४ मध्ये तयार करण्यात आले होते. पण हे ठिकाण खासकरून जपानी प्रवाश्यांसाठी तयार केलेले असल्यामुळे या हॉटेलमध्ये भारतीयांना प्रवेश बंदी करण्यात आली होती. त्यानंतर २०१४ मध्ये सरकारने जातीय भेदभावच्या अंतर्गत हे हॉटेल सिलबंद केले होते. गोव्याला काही ठिकाणी खासगी बस आहेत त्याठिकाणी भारतीयांना प्रवेशबंदी आहे. कारण या ठिकाणी परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर जातात. टॅग्स :ट्रॅव्हल टिप्सTravel Tips