Do You Know रिडर्स कॅफे? वाचाल तर वाचाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 06:09 PM2019-08-12T18:09:52+5:302019-08-12T18:14:19+5:30

पुस्तक वाचन हाही अनेकांचा छंद असतो, आपल्या या छंदातून ही वाचक मंडळी नेहमीच ज्ञान ग्रहण करते. मात्र, यासाठी मन शांत आणि परिसरही शांत हवा.

सीसीडी, बरिस्ता, स्टारबक्स यांसारख्या कॉफीशॉपमध्ये तुम्हाला वाचनासाठी दर्जेदार पुस्तके मिळतात.

पुस्तकप्रेमींसाठी आता नव्याने रिडर्स कॅफे हा उत्तम पर्याय सुरू झाला आहे. ज्यांना खान-पान करताना वाचायला आवडतं. त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे.

रिडर्स कॅफेतील इंटेरियर डिझाईन अतिशय उत्कृष्ट आहे. पेन्सील आणि पुस्तकांनी सजलेलं हे कॅफे बनविण्यासाठी सायकलच्या चाकांचा आणि चैनीचा वापर करण्यात आला आहे.

याठिकाणी प्रकाश पडावा यासाठी बल्बचाही वापर करण्यात आला आहे. येथील भिंतींवर सुंदर व आकर्षक चित्रेही बनविण्यात आली आहेत.

इंदिरापुरम हॅबिटेट सेंटर येथे हा कॅफे सुरू करण्यात आला असून श्रुती उपाध्याय यांच्या मुलीने येथील पुस्तकांची मांडणी व सजावट केली आहे.

एका हातात पुस्तक आणि दुसऱ्या हातात चहाचा कप आणि सुंदर छान, मनमोहक पुस्तकालय असेल तर बात बन गयी....