Enjoy Holiday in these beautiful hotels ...
या निसर्गरम्य हॉटेल्सवर एन्जॉय करा वीकेंड... By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2018 03:57 PM2018-10-10T15:57:46+5:302018-10-10T16:02:22+5:30Join usJoin usNext मोठ-मोठ्या मार्बल्सच्या बाथटबमध्ये तुम्हाला स्नान करायचा आनंद घ्यायचा असल्यास, राजस्थानमधील रंथबोर येथे जायलाचं हवं. येथील अमन की खास या खास हॉटेलला भेट द्यायलाच हवी. जम्मू आणि काश्मीरच्या लडाख येथील निम्मू हाऊस हे हॉटेलही बेस्ट डेस्टीनेशन प्लेस आहे. साधारण 1920 पूर्वी हे हॉटेल बांधण्यात आले असून ती ऐतिहासिक वास्तू आहे. कर्नाटकच्या कुर्गमधील तमरा येथील हॉटेलही एक नैसर्गिक पर्यटनस्थळच आहे. कॉफीच्या शेतीसाठी येथील प्रदेश प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला झांडांनी वेढलेल्या हॉटेलात राहण्याचा सुखद आनंद घेता येईल. राजस्थानमधील छत्र सागर या हॉटेल्समध्ये तुम्हाला वेगळाच अनुभव मिळेल. मुघलकालीन डिझाईनमधील शामियान्यात जेवणाचा आनंद घेता येईल. हॉटेल्सच्या बाजूलाच खळखळणारे पाणी अन् निसर्गसौंदर्यही मन प्रसन्न करते. केरळचे फिलीपकट्टी फार्म हे हॉटेल निसर्गरम्य ठिकाण आहे. हे फार्म हॉटेल म्हणजे जणू आईसलँडच होय. हॉटेलच्या आजुबाजूने वाहत्या पाण्याचा सुंदर नजराना दिसतो. टॅग्स :हॉटेलपर्यटनhoteltourism