कमी खर्चात... कोणत्या महिन्यात, कुठे फिरायला जाल? By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 05:22 PM 2018-11-19T17:22:54+5:30 2018-11-19T17:31:39+5:30
अनेकांना फिरण्याची आवड असते. पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्याकडे फिरण्याची आवड असणाऱ्या अनेक व्यक्ती आहेत पण त्यातल्या अनेक जणांना कधी आणि कुठे फिरायला जावं? याबाबत माहिती नसते. हाताच्या बोटावर मोजण्याइतकी लोकं अशी असतात की, जी पीक सीजन आणि ऑफ सीजनच्या मधल्या वेळात प्लॅन करतात. असं केल्यामुळे या लोकांचे पैसे वाचतात. जाणून घ्या कोणत्या हॉलिडे डेस्टिनेशनवर कोणत्या महिन्यात जाणं उत्तम ठरतं त्याबाबत...
काही लोकांना लदाखला जाण्याची फार इच्छा असते. तुम्ही जर शून्यापेक्षा कमी तापमान सहन करू शकत असाल तर जानेवारीमध्ये या ठिकाणी भेट देऊ शकता. येथे जाण्यासाठी असलेला मनाली - लेह हायवे बंद झाला तरी येथे हवाई मार्गाने पोहचता येते.
आसामच्या माजूली द्विपमध्ये जास्त मानवी वस्ती नाही, परंतु ब्रम्हपुत्रेच्या वाढत्या खोऱ्यामुळे येथे जाणं अॅडव्हेंचरपेक्षा कमी नाही. येथे फेब्रुवारीमध्ये जाणं उत्तम ठरतं. या काळात येथे संस्कृतीचं दर्शन घडवणारे मठ आणि म्यूझिअमसोबतच निसर्गसौंदर्य अनुभवायला मिळते.
मार्च महिन्यामध्ये राजस्थानमधील प्रसिद्ध हिल स्टेशन माउंट आबूला भेट देऊ शकता. या महिन्यामध्ये येथे पटोत्सव आणि स्वस्त हॉटेल्सचा आनंद घेऊ शकता.
एप्रिल महिन्यामध्ये तुम्हाला थंडीमधील पर्यटकांच्या गर्दीचा अजिबात त्रास होणार नाही. या काळात तुम्ही उत्तराखंडमधील डोंगररांगांमध्ये आपला मोर्चा वळवू शकता.
सफारी फिरण्यासाठी उन्हाळ्यासारखा दुसरा महिना नाही. मे महिन्यामध्ये फिरण्यासाठी मध्यप्रदेशच्या बांधवगढसारखं दुसरं ठिकाण नाही. तुम्हाला येथे जंगलाचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंहाचं दर्शन घडेल. त्याचप्रमाणे येथे राहण्यासाठीही फार खर्च येणार नाही.
जूनमध्ये उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी जास्तीत जास्त लोकं मनाली, शिमला सारख्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन करतात. परंतु अरूणाचल प्रदेशच्या दिरंगमध्ये शांततेत निसर्ग सौंदर्य न्याहाळण्याची मज्जा काही औरच असते.
जुलै महिन्याच्या पावसाळ्यामध्ये गोव्याला फिरायला जाणं हा उत्तम मार्ग आहे. याच्या काही महिन्यांनंतर येथे पर्यटकांची फार गर्दी होते. याव्यतिरिक्त यावेळी येथील स्थानिय स्पा तुम्हाला आयुर्वेदाची जादू अनुभवण्यास मदत करतील.
नोव्हेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या पीक सीजनमध्ये न जाता ऑगस्टमध्ये उदयपूरला भेट द्या. या महिन्यात पर्यटकांच्या गर्दीपासून तुमची सुटका होईल.
सप्टेंबरमध्ये केरळचा पाऊस आणि आयुर्वेदिक हेल्थ पॅकेज तुम्हाला बजेटमध्ये मिळेल. शहरातील धावपळ आणि तणावापासून दूर येथे तुम्हाला शांतता मिळण्यास मदत होईल.
ऑक्टोबरमध्ये पावसाळा संपून हळूहळू वातावरणात थंडावा जाणवू लागतो. अशातच हिमालयाच्या डोंगररांगा तुमचं मन प्रसन्न करण्यासाठी मदत करतील. त्याचसोबत हॉटेलच्या रूम्स 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतील.
नोव्हेंबर महिन्यामध्ये देशाच्या अनेक भागांमध्ये थंडी वाढते. अशातच सिक्कीमला भेट देणं फायदेशीर ठरतं. निसर्गसौंदर्याचं अलौकीक दर्शन येथे तुम्हाला घडेल.
डिसेंबर महिना देशातील जास्तीतजास्त भागांमध्ये पीक सीझन आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, अरूणाचल प्रदेश आणि उत्तराखंडामध्ये जोरदार बर्फवृष्टी होते. अशावेळी अनेक पर्यटन स्थळांवर पर्यंटकांची गर्दी असते. त्यामुळे अशावेळी फिरायला जाणं शक्यतो टाळावं.