food addicts must be included in these 7 famous food festivals
खवय्ये असाल तर जगभरातील 'या' फूड फेस्टिव्हल्सला नक्की भेट द्या! By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 05:41 PM2018-07-31T17:41:23+5:302018-07-31T17:58:31+5:30Join usJoin usNext काही लोकं खवय्ये असतात. त्यांना नवनवीन पदार्थ चाखण्याची आवड असते. अशी लोकं कुठेही फिरायला जाण्याचा विचार करतात त्यावेळी ते त्या ठिकाणी मिळणाऱ्या पदार्थांचाच विचार करतात. जर तुम्ही देखील फिरण्यासोबतच नवनवीन पदार्थ खाण्याचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी ही माहिती नक्की फायदेशीर ठरेल. जाणून घेऊयात जगभरातील नावाजलेल्या फूड फेस्टिव्हल्सबाबत... Wild Food Featival,न्यूझिलॅन्ड - जर तुम्हाला नॉन व्हेज पदार्थ फार आवडत असतील तर तुम्ही या फूड फेस्टिव्हलला नक्की भेट द्या. या फेस्टिव्हलमध्ये तुम्हाला अनोख्या पदार्थांची चव चाखायला मिळेल. मार्चमध्ये आयोजित करण्यात येणारं हे फेस्टिव्हल न्यूझिलॅन्डच्या साऊथ आर्यलॅन्डच्या वेस्ट कोस्टमध्ये असतं. Salon De Chocolate, इक्वाडोर - तुम्ही चॉकलेट्ससाठी क्रेझी असाल तर या फूड फेस्टिव्हलला नक्की भेट द्या. इथे तुम्हाला जगभरातील बेस्ट चॉकलेट्स चाखण्याची संधी मिळेल. जूनमध्ये भरवण्यात येणाऱ्या या फूड फेस्टिव्हलमध्ये चॉकलेट्सची चव चाखण्यासाठी पर्यटक लांबून येतात. PizzaFest, इटली - इटलीचे पिझ्झा फेस्टिव्हल पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या फेस्टिव्हलमध्ये तब्बल 10 लाख पद्धतीचे पिझ्झा खायला मिळतात. या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी जगभरातून तब्बल 5 लाख पर्यटक येतात. PoutineFest, कॅनडा - कॅनडाचा पारंपारिक पदार्थ Poutine खाण्याची इच्छा असेल तर या फूड फेस्टिव्हलला जरूर भेट द्या. इथे तुम्ही फ्रेंच फ्राइझसोबत चीज कर्ड आणि ग्रेवीची चव चाखू शकता. याव्यतिरिक्त तुम्ही अनेक आंतराष्ट्रीय पदार्थांचीही चव चाखू शकता. Castagnades Chestnut Festival, फ्रान्स - फ्रान्समध्ये भरवण्यात येणाऱ्या या चेस्टनट्स फूड फेस्टिवलमध्ये तुम्ही सुपपासून केकपर्यंत अनेक पदार्थांची चव चाखू शकता. Dumpling Festival, हॉगकॉग - तुम्हाला चायनिज फूडची मजा घ्यायची असेल तर जूम महिन्यामध्ये भरवण्यात येणाऱ्या या फेस्टिव्हलला जरूर भेट द्या. हॉगकॉगमध्ये या फेस्टिव्हलच्या दिवशी Zongzi Dumpling नावाचा पदार्थ खाण्यात येतो. या पदार्थामध्ये भातासोबत अनेक पदार्थांचे मिश्रण एकत्र करून बाम्बू किंवा कमळाच्या पानामध्ये टाकून सर्व्ह केले जाते. Vegetarian Festival, थायलॅन्ड - थायलॅन्डमध्ये आयोजित करण्यात येणारे फूड फेस्टिव्हल जवळपास 9 दिवस चालते. तुम्ही हे जाणून हैराण व्हाल की, हे फेस्टिव्हल बॉडी डीटॉक्सीफिकेशनसाठी आयोजित करण्याते येते. या फूड फेस्टिव्हलमध्ये फक्त शाकाहारी पदार्थांची चव चाखता येते. टॅग्स :अन्नप्रवासआंतरराष्ट्रीयfoodTravelInternational