Four Places to Remember!
आठवणीत राहतील अशी चार ठिकाणं ! By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 04:22 PM2019-10-30T16:22:24+5:302019-10-30T21:59:16+5:30Join usJoin usNext सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी अनेकजण विविध प्लॅन आखताना पाहायला मिळते. असे प्लॅन आखणाऱ्यांसाठी काही खास ठिकाणांची आम्ही माहिती घेऊन आलो आहेत. या ठिकाणी सुट्ट्यांचा पुरेपूर आणि आठवणीत राहील असा आनंद घेता येईल. ताज लेक पॅलेस, उदयपूर : 1743 मध्ये महाराजा जगतसिंह यांनी ताज लेक पॅलेस बांधला. उदयपूरच्या लेक पिचोला नावाच्या रमणीय तलावाच्या मधोमध असलेल्या जग निवास नावाच्या बेटावर वसलेले लेक पॅलेस म्हणजे येथील मेवाडच्या राजघराण्याचे परंपरागत निवासस्थान. मात्र, कालांतराने याचे आलिशान हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले. याठिकाणी अनेक पर्यटक येत असतात. तसेच, अनेक सुविधा याठिकाणी आहेत. हॉटेल प्लेजेंट हवेली, जैसलमेर : राजस्थानमधील शानदार हॉटेलपैकी एक असलेले हवेली. राजवाड्यासारखे हे हॉटेल तयार करण्यात आले आहे. जर तुम्ही सुट्ट्यांमध्ये जैसलमेरमध्ये जात असाल तर राहण्यासाठी या सुंदर ठिकाणी जाऊ शकता. कायरा हाऊस, वारकला : जर तुम्ही सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी केरळला जाणार असाल तर येथील वारकलामध्ये असलेल्या कायरा हाऊसमध्ये आराम करू शकता. या हाऊसमधील खोल्यांमध्ये एक वेगळी खासियत असून विविध थीमवर तयार करण्यात आल्या आहेत. या खोल्या पाहिल्यानंतर केरळ, चीन आणि जपानची संस्कृती दिसून येते. ओल्ड हर्बल हॉटेल, कोच्ची : कोच्चीमध्ये असलेल्या ओल्ड हर्बल हॉटेलमध्ये राहण्याचा आनंदच वेगळा आहे. अनेक पर्यटक या हॉटेलची स्तुती करतात. हॉटेल्या परिसरात असलेली गार्डन आणि येथील खोल्यांचा आकार मोठा व सुंदर आहे. टॅग्स :ट्रॅव्हल टिप्सTravel Tips