अरे व्वा! आता पुन्हा धावणार भारतीय रेल्वेची luxuri ट्रेन; ५ लाख रूपये भाडं अन्...; जाणून घ्या खासियत By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 05:41 PM 2021-03-16T17:41:59+5:30 2021-03-16T18:06:44+5:30
Golden chariot luxury train :जर तुम्ही ६ रात्री आणि ७ दिवसांची प्लॅन घेऊ इच्छित नसाल तर तुम्ही ३ रात्रींचे पॅकेजसुद्धा घेऊ शकता. ज्यात तुम्हाला बँगलुरू, म्हैसुर, हम्पी, महाबलीपुरम फिरण्याची संधी मिळू शकते. भारतीय रेल्वेची लग्जरीअस ट्रेन गोल्डन चॅरिएट पुन्हा एकदा रूळांवर धावणार आहे. दक्षिण भारताची सफर घडवणारी हे ट्रेन १४ मार्चपासून ग्राहकांच्या सेवेसाठी पुन्हा सुरू झाली. द प्राईड ऑफ कर्नाटक नावानं प्रसिद्ध असलेली गोल्डन चॅरिएट ट्रेन १४ मार्चपासून ६ रात्री आणि सात दिवसांसाठी यशवंतपूर बँगलुरू रेल्वे स्टेशनवरून सुरू झाली.
आयआरसीटीसीनं दिलेल्या माहितीनुसार गोल्डन चॅरिएट बँगलुरूपासून बांदीपूर नॅशनल पार्क, मैसूर, हॅलेबिड, चिकमंगलुरू, हम्पीचा प्रवास करत सात दिवसांनी परतणार आहे. या ट्रेनच्या प्रवासाचा आनंद घेण्यासाठी दोन प्रकारच्या योजना आखण्यात येणार आहेत.
जर तुम्ही ६ रात्री आणि ७ दिवसांची प्लॅन घेऊ इच्छित नसाल तर तुम्ही ३ रात्रींचे पॅकेजसुद्धा घेऊ शकता. ज्यात तुम्हाला बँगलुरू, म्हैसुर, हम्पी, महाबलीपुरम फिरण्याची संधी मिळू शकते.
प्राईड ऑफ कर्नाटक आणि ज्वेल ऑफ साऊथ चे हे दोन पॅकेज आहेत. ज्याचं भाडंसुद्धा वेगवेगळं आहे. द ज्वेल्स ऑफ साऊथ इंडीयाची सफर २१ मार्चला सुरू होणार आहे. तर या ट्रेनचं बुकिंग करण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाईट goldenchariot.org वर जाऊन बुकिंग करू शकता.
ही ट्रेन कोणत्याही फाईव्ह स्टार हॉटेलला टक्कर देईल अशी आहे.
या ट्रेनमध्ये जीम, स्पा, गाद्या, फर्नीचर, आलिशान खोल्या, बाथरूम असून यांची रचना खास डिजायर्नसकडून करण्यात आली आहे.
दरम्यान ही शाही ट्रेन २००८मध्ये कर्नाटक राज्य पर्यटन विकास पालिकेकडून सुरू करण्यात आली होती. त्यानंतर या ट्रेनटी सुत्र आयआरसीटीसीकडे सोपावण्यात आली.