Here you get a happy world, here it is only for the new child
जाँ तुझको सुखी संसार मिले, इथे नवऱ्या मुलाचीच होतेय पाठवणी By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 11:20 PM2019-04-01T23:20:56+5:302019-04-01T23:25:53+5:30Join usJoin usNext मेघालयमध्ये लग्न संस्थेसंदर्भात एक अनोखाच नियम प्रचलित आहे. इथले लोकही भारतात राहणाऱ्या इतर लोकांच्या तुलनेत काहीसे वेगळे आहेत. मेघालयातल्या तीन प्रमुख अनुसूचित जामी-जमातींमध्ये एक भारीच प्रथा आहे. गारो, खासी आणि जयंतिया या जमातींमध्ये नववधूची नव्हे, तर नवरदेवाची पाठवणी केली जाते. या जमातींतल्या लग्नाच्या प्रथेनुसार, मुलगा लग्नानंतर मुलीच्या घरी जाऊन राहतो. गेल्या 2 हजार वर्षांपासून इथे ही प्रथा चालत आलेली आहे. ही परंपरा या जातीच्या पूर्वजांनी प्रचलित केली होती, त्यानुसारच ती चालत आली आहे. मेघालयातल्या या जातींमधल्या कोणत्याही मुलीशी लग्न केल्यानंतर मुलाला वधूच्या घरी जाऊन राहावं लागतं.