सुट्टीवर जाण्याचा प्लॅन करत असाल तर वाचा कोरोना संबंधित सर्व राज्यांचे नियम

By ravalnath.patil | Published: September 28, 2020 02:00 PM2020-09-28T14:00:50+5:302020-09-28T14:53:41+5:30

कोरोना विषाणूचा सर्वाधिक परिणाम पर्यटन क्षेत्रातच झाला आहे. मात्र आता बर्‍याच राज्यांनी आपली सीमा पर्यटकांसाठी उघडली आहे. राज्यांनी अनेक नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, जी प्रत्येक पर्यटकांना वाचणे महत्त्वाचे आहे. तुम्हीही कुठेतरी फिरायचं ठरवत असाल तर कोणतीही अडचण येऊ नये म्हणून राज्यांची या मार्गदर्शकतत्त्वे नक्कीच जाणून घ्या...

आंध्र प्रदेश- तेलंगणा आणि कर्नाटक येथून येणा-या लोकांना १४ दिवस क्वारंटाइनआवश्यक आहे. आंतरराज्य प्रवासावर कोणतेही बंधन नाही.

अरुणाचल प्रदेश - राज्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांना राज्यातील चेक गेट व हेलिपॅडवर रॅपिड अँटिजन टेस्ट करावी लागणार आहे. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास १४ दिवसांसाठी घर किंवा संस्थात्मक क्वारंटाइन आवश्यक आहे. राज्यात प्रवासाला कोणतेही बंधन नाही.

आसाम - राज्यातील प्रवासावर कोणतेही बंधन नाही. राज्यात आलेल्या लोकांना ९६ तासांत अँटीजन चाचणी करावी लागेल. कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर १० दिवस क्वारंटाइन राहावे लागते.

छत्तीसगड - या राज्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यक नाही. तसेच, इतर राज्यामधून येणार्‍या प्रवाशांसाठी १४ दिवस क्वारंटाइन होणे आवश्यक आहे. रायपूरसह अनेक जिल्ह्यांना कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले गेले आहे.

गोवा - इतर राज्यातून येणाऱ्या प्रवाशांनायेथे आल्यावर कोरोना टेस्ट करणे आवश्यक नाही. प्रवाशांना ई-पास, कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट आणणे देखील आवश्यक नाही. राज्यात बार उघडण्यात आले आहेत. मात्र, ग्राहकांना सर्व सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे. बीच शॅक आणि कॅसिनो बंद राहणार आहेत.

गुजरात - अहमदाबाद, भावनगर, पोरबंदर विमानतळांवर थर्मल स्क्रीनिंग आवश्यक आहे. क्वारंटाइन होणे अनिवार्य नाही. अहमदाबाद आणि सुरतमध्ये ५० टक्के प्रवासी क्षमतेवर बसेस चालविल्या जात आहेत. तर इतर ठिकाणी बसेस ६० टक्के प्रवासी क्षमतेवर सुरु आहेत.

हिमाचल प्रदेश - हिमाचल प्रदेशात येणाऱ्या पर्यटकांना सीमेवर प्रवेश करताना राज्याच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करणे किंवा कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट देणे आवश्यक नाही. मात्र, येथे सध्या आंतरराज्यीय बससेवा बंद राहतील. ऑक्टोबरच्या शेवटपर्यंत किन्नौर आणि स्पीती व्हॅलीमध्ये पर्यटनाशी संबंधित सर्व उपक्रम बंद राहतील. पर्यटकांना आरोग्य सेतु डाऊनलोड करावे लागतील. पर्यटकांना आता महामार्गावर थांबता येणार नाही, त्यांना थेट त्यांच्या नियुक्त ठिकाणी थांबावे लागेल.

झारखंड - याठिकाणी आंतरराज्यीय बस सेवा बंद आहेत. हॉटेल, लॉज, रेस्टॉरंट्स पुन्हा सुरू झाले आहेत. येथे पोहोचल्यावर सर्व प्रवाशांना त्यांची वैयक्तिक माहिती www.jharkhandtravel.nic.in या अधिकृत वेबसाइटवर नोंदवावी लागेल.

जम्मू-काश्मीर - येथे येणाऱ्या पर्यटकांना कोरोनाची चाचणी करून घेणे बंधनकारक आहे. विमान/ रेल्वे प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाइन आवश्यक आहे. प्रवाशांच्या फोनमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप असणे आवश्यक आहे. रोड ट्रिप करणार्‍या प्रवाशांना त्यांचे अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत प्रशासकीय क्वारंटाईन नियमांचे पालन करावे लागेल.

कर्नाटक - इतर राज्यामधून येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाइन बंधनकारक नाही. पर्यटकांना सेवा सिंधू पोर्टलवर नोंदणी करण्याची देखील आवश्यकता नाही.

केरळ - पर्यटकांना जगराता पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. त्यानंतर एंट्री पास मिळेल. या पासमुळे लोकांना राज्यात प्रवेश करू शकेल. परदेशातून किंवा इतर ठिकाणाहून येणाऱ्या लोकांना १४ दिवस क्वारंटाइन राहावे लागेल.

महाराष्ट्र - आंतरराज्य प्रवासावर बंदी आहे. राज्यात राहणाऱ्या लोकांना याठिकाणी प्रवासाठी कोणतेही बंधन नाही. मुंबईत अद्याप सामान्यांसाठी लोकल रेल्वे प्रवास बंद आहे.

मिझोरम - प्रवाशांसाठी फक्त सोमवार, गुरुवार आणि शनिवारी विमान सुविधा उपलब्ध आहे. रात्री ८.३० ते सकाळी ४.३० वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

राजस्थान - सर्व प्रवाशांना राज्यात येण्याची परवानगी आहे. जयपूर, जोधपूर, कोटा, अजमेर, अलवर, भिलवाडा, बीकानेर, उदयपूर, सीकर, पाली आणि नागौर या ११ पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आली आहे. कॅब, बस, ऑटोरिक्षासह सर्व वाहने सुरु आहेत. पण, जादा प्रवासी वाहनात बसू शकत नाहीत.

सिक्कीम - हॉटेल्स, होमस्टे आणि अन्य पर्यटन संबंधित सेवा १० ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होणार आहेत. २७ सप्टेंबरपासून हॉटेल आणि होमस्टेसाठी बुकिंग सुरू झाले आहे. पश्चिम बंगालची सीमा १ ऑक्टोबरपासून उघडली जाणार आहे.

तामिळनाडू - रेल्वे, विमान किंवा रस्तेमार्गे अन्य राज्यातून येणाऱ्यांसाठी ई-पास अनिवार्य आहे. क्लब, हॉटेल आणि रिसॉर्ट्स आवश्यक नियमांनुसार चालवतील. सप्टेंबरपासून दररोज ५० उड्डाणे चेन्नई विमानतळावर येऊ शकतील.

उत्तर प्रदेश - विमानतळावर प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करणे आवश्यक आहे. याशिवाय, १४ दिवस क्वारंटाइन देखील आवश्यक आहे. जर आपल्याला सात दिवसात परत यायचे असेल तर क्वारंटाइन अनिवार्य असणार नाही.

उत्तराखंड - बाहेरुन राज्यात येणाऱ्या लोकांसाठी www.smartcitydehonto.uk.gov.in या वेब पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक आहे. पर्यटकांसाठी, राज्यात दोन दिवसांचे अनिवार्य बुकिंग बंद केले गेले आहे. पर्यटकांना कोरोनाचा निगेटिव्हचा अहवालही दाखवावा लागणार नाही. सर्व बॉर्डर चेकपोस्ट, विमानतळ, रेल्वे स्थानक आणि सीमा जिल्हा बसस्थानकांवर थर्मल स्क्रीनिंग अनिवार्य आहे. पर्यटकांना आरोग्य सेतु अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल, मास्क लावणे आणि सोशल डिस्टंसिंग पाळणे बंधणकार आहे.

पश्चिम बंगाल - येथे विमान बंदी असून विशेष ट्रेनने येण्याची सोय आहे.