Hornbill Festival will be celebrated tripura state
हॉर्नबिल फेस्टिवल नागालॅंडशिवाय 'या' राज्यात होणार साजरा By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2020 03:49 PM2020-02-09T15:49:34+5:302020-02-09T16:28:19+5:30Join usJoin usNext नागालॅंडची संस्कृती आणि परंपरांचे दर्शन घडवत असलेल्या हॉर्नबिल फेस्टिवलचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असणारा हा फेस्टिवल आहे. संस्कृतीचे जपणूक करण्यासाठी हा फेस्टिवल दरवर्षी साजरा केला जातो. पारंपारिक पोशाखात या ठिकाणचे लोक असतात. हा फेस्टिवल पाहण्यासाठी तसंच मोठ्या संख्येने वेगवेगळ्या देशातील लोक भेट देण्यासाठी येत असतात. नागालॅंडच्या किसमा गावात हा फेस्टिवल असतो. हा हॉर्नबिल नावाचा सुंदर पक्षी आहे. त्रिपुरा या राज्यात सुद्धा हा फेस्टिवल आयोजित करण्यात आला आहे. आम्ही तुम्हाला या फेस्टिवलबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत. त्रिपुरा विधानसभेचे प्रमुख यांनी हॉर्नबिल फेस्टिवल’चे आयोजनामागचं कारण स्पष्ट केले आहे. फेब्रुवारी महिन्यात त्रिपुरातील बारामुरा इको-पार्क परिसरात हॉर्नबिल फेस्टिवल’ चे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणच्या पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी तसंच पर्यटन व्यवसाय वाढीस लागण्यासाठी या फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. हॉर्नबिल पक्षाच्या नावावर फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी त्रिपुरा या राज्यात ३०० पेक्षा जास्त हॉर्नबिल पक्षी पहायला मिळाले. त्रिपुरातील वन विभागाने 'ओरिएंटल पाइड हॉर्नबिल’ला सिपाहीजाला या वन्यजीव अभयारण्यात ठेवले आहे. टॅग्स :ट्रॅव्हल टिप्सTravel Tips