If you want to earn money while traveling around the world, then this field can be the best option
जग फिरता फिरता पैसे कमवायचे असतील तर या फिल्ड ठरू शकतात उत्तम पर्याय By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 05:45 PM2018-10-17T17:45:11+5:302018-10-17T18:17:30+5:30Join usJoin usNext फिरणं सर्वांनाच आवडतं. पण इच्छा असूनही फिरणे अनेकांना शक्य होत नाही. मात्र अशा काही नोकऱ्या आहेत जिथे काम करता करता तुम्ही जगभर फिरू शकता. पर्यटन विभाग - पर्यटन विभागात काम करण्याची संधी मिळाल्यास तुम्ही काम करता करता विविध पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता. ट्रॅव्हल एजन्सी - देशविदेशात विविध टूर आयोजित करणाऱ्या ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विविध टूरच्या निमित्ताने देशविदेशात फिरण्याची संधी मिळते. ट्रॅव्हल ब्लॉगर - तुम्ही ट्रॅव्हल ब्लॉगर असाल तर विविध पर्यटन स्थळांची माहिती ब्लॉगवर लिहून त्या माध्यमातून तुम्ही पैसे कमवू शकता. ट्रॅव्हल गाइड - पर्यटन व्यवसाय वाढत असल्याने विविध पर्यटन स्थळांची माहिती असणाऱ्या ट्रॅव्हल गाइडना त्या माध्यमातून चांगले पैसे कमवता येतात. हॉटेल इंडस्ट्री - ट्रॅव्हल आणि हॉटेल व्यवसाय एकमेकांशी निगडीत आहेत. त्यामुळे तुम्ही हॉटेल व्यवसायामध्येही आपले करिअर करू शकता. तसेच तुम्हाला चांगला अनुभव असेल तर तुम्हाला देशविदेशातील आघाडीच्या हॉटेलमध्ये काम करण्याची संधी मिळू शकते. टॅग्स :पर्यटननोकरीtourismjob