if you want to travel solo first know these 5 essential things
सोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात?, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 03:09 PM2018-09-21T15:09:26+5:302018-09-21T15:20:07+5:30Join usJoin usNext 1. कुटुंबीय किंवा मित्रांना माहिती द्या : ज्या ठिकाणी सोलो ट्रिपला जात आहात त्या ठिकाणाबाबतची संपूर्ण माहिती कुटुंबीय किंवा मित्र मैत्रिंणींना द्यावी. याशिवाय, कोणत्याही मित्र किंवा नातेवाईकाच्या संपर्कात राहा. सोलो ट्रिपसाठी कोणत्या फ्लाइटनं, ट्रेननं जात आहात?, ट्रिप किती दिवसांची आहे?, वास्तव्य कोठे असणार आहे?, अन्य सर्व माहिती कुटुंबीयांना द्यावी. 2. सामानाची काळजी घ्यावी : सोलो ट्रिप करताना जास्त सामान घेऊन जाऊ नये. आवश्यकतेनुसारच सामानाची बांधाबांध करावी. याशिवाय, पासपोर्ट आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रांच्या प्रतीसोबत घ्याव्यात. या प्रती वेगवेगळ्या पर्समध्ये ठेवाव्यात. महत्त्वाची कागदपत्रं स्कॅन करुन ई-मेल किंवा लॅपटॉपमध्ये सेव्ह करावीत. 3. नियोजबद्ध प्लानिंग करावे : सोलो ट्रिपसाठी आयत्यावेळी नाही तर साधारणतः दोन-तीन महिन्यांपूर्वीच प्लानिंग करण्यास सुरुवात करावी. म्हणजे ट्रिपदरम्यान कोणताही त्रास होणार नाही. 4. Must Visit List : प्रवासापूर्वीच आपली एक Must Visit List तयार करुन ठेवावी. सोलो ट्रिपसाठी ठरवलेल्या ठिकाणी कोण-कोणत्या स्थळांना भेट द्यायची आहे, हे ट्रिपपूर्वीच ठरवावे. त्यामुळे ऐनवेळेस कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. 5. घाई नको : प्रवासादरम्यान कोणत्याही गोष्टीसाठी घाई-घाई करू नये. विशेषतः एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना अजिबात घाई करू नये. एकाच दिवसात संपूर्ण ठिकाणे फिरण्याचा प्रयत्न करू नये. घाई करण्याच्या नादात तुम्ही सोलो ट्रिपच्या आठवणींची साठवण करू शकणार नाही.