Incredible villages of India where you must visit
भारतातील आवर्जून भेट द्यावी अशी 8 अनोखी गावं! By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 02:37 PM2018-04-06T14:37:28+5:302018-04-06T14:37:28+5:30Join usJoin usNext 2000 साली ओडिसातील रघुराजपूर या गावाला राज्यातील पहिलं हेरिटेज गाव असल्याचा बहुमान मिळाला. हे गाव पट्टचित्र कलेसाठी लोकप्रिय आहे. या गावातील लोक ट्रायबल पेंटिंग, पेपर टॉय, वुडन टॉय बनवून आपला उदरनिर्वाह करतात. या गावातील प्रत्येक व्यक्ती कलाकार आहे. या गावाच्या या वेगळेपणामुळे इथे अनेक लोक भेट देतात. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण तिलौनिया या गावातील प्रत्येक व्यक्ती सोलर इंजिनिअर आहे. या गावातील प्रत्येक छतावर तुम्हाला एक सोलर पॅनल चमकतांना दिेसेल. या गावातील लोकांना शिकवण्याचं काम संजीत रॉय यांनी केलं. अजमेरमधील या गावातील प्रत्येक व्यक्ती सोलर पॅनल इंस्टॉल आणि रिपेअर करु शकतो. मट्टूर हे गाव हजारों वर्ष जुनी आपली संस्कृती आणि सभ्यता टिकवून आहे. या गावातील प्रत्येक व्यक्ती हा संस्कृत भाषा बोलतो. येथील लोक एक वैदिक जीवन जगतात. या गावाला संस्कृत गावंही म्हटलं जातं. हे गाव बंगळुरुपासून 300 किमी दूर आहे. नांदेड जिल्ह्यातील कथेवाडी हे गाव आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी दत्तक घेतलं आहे. या गावाला आर्ट ऑफ लिविंग संस्थेने एक मॉडल व्हिलेज केलं आहे. या गावातील लोक आता अजिबात दारु पित नाहीत. राळेगणसिध्दी या गावाचं नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. याच गावातून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार विरोधात देशाला एकत्र आणण्याचा नारा दिला होता. पनामिक गाव सियाचिनमध्ये आहेत. या गावाजवळून गरम पाण्याची धारा वाहते. लांबून लांबून लोक इथे गरम पाण्यात डुबकी मारण्यासाठी येतात. महत्वाची बाब म्हणजे हे गाव समुद्र तळापासून दहा हजार फूट उंचावर आहे. या गावामध्ये जाण्यासाठी जून ते सप्टेंबर हा काळ सर्वात चांगला मानला जातो. वेलास मुंबईपासून 230 किमी दूर रत्नागिरीत आहे. हे गाव समुद्र किना-यावर आहे. फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात इथे कासवांना बघण्यासाठी लांबून येतात. हे गाव एका एनजीओने दत्तक घेतलं आहे. या संस्थेचे लोक कासवांची काळजी घेतात. या गावात कासव उत्सव आयोजित केला जातो. लांबासिंगी या गावात काही वर्षांपूर्वी बर्फवृष्टी झाली होती. ज्यानंतर आंध्र प्रदेशातील हे गाव चर्चेत आलं होतं. या गावाला दक्षिण भारतातील काश्मीरही म्हटलं जातं. या गावात थंडीच्या दिवसात प्रर्यटक मोठी गर्दी करतात. हिवाळ्यात या गावातील वातावरण वेगळंच असतं. तुम्ही इथे डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान जाऊ शकता.टॅग्स :प्रवासTravel