an indian village where villagers enjoys dual citizenships
दोन देशांच्या सीमेवरचं गाव! सरपंचाची बेडरुम भारतात अन् किचन म्यानमारमध्ये By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2018 02:57 PM2018-09-28T14:57:34+5:302018-09-28T15:04:31+5:30Join usJoin usNext भारत आणि म्यानमारच्या सीमेवर वसलेलं लांगवा गाव अतिशय वैशिष्टपूर्ण आहे. नागालँडच्या मोन जिल्ह्यातलं या गावाचा काही भाग भारतात, तर काही भाग म्यानमारमध्ये आहे. लांगवा गाव शहरापासून 42 किलोमीटर आहे. या गावच्या सरपंचाचं निम्मं घर भारतात, तर निम्मं घर म्यानमारमध्ये आहे. भौगोलिकदृष्ट्या लांगवाचं स्थान अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे इथल्या सरपंचाची बेडरुम भारतात आहे, तर किचन म्यानमारमध्ये. लांगवा गावातील लोकांना भारतात आणि म्यानमारमध्ये प्रवेश मिळतो. त्यांना यासाठी विसा लागत नाही. या गावातील लोकांकडे दोन देशांचं राष्ट्रीयत्व आहे. जगातील अनेक देशांच्या सीमांवर तणाव असतो. पाकिस्तान, चीनसोबतच्या सीमेवर तर वर्षभर स्फोटक परिस्थिती असते. मात्र लांगवा गावातील चित्र पूर्ण वेगळं आहे. टॅग्स :जरा हटकेम्यानमारJara hatkeMyanmar