महाराष्ट्रातील लोणार सरोवराबद्दल माहीत नसलेल्या 'या' रहस्यमय गोष्टी ....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 05:13 PM2020-03-09T17:13:34+5:302020-03-09T17:24:01+5:30

महाराष्ट्राच्या बुलढाणा जिल्ह्यातील भव्य लोणार सरोवर हे सगळयांनाच माहीतच आहे. आज आम्ही तुम्हाला या सरोवराच्या काही रहस्यांबाबत सांगणार आहोत. साधारणपणे ५ लाख ७० हजार वर्ष जुनं असलेल्या या सरोवराचा उल्लेख वेदांमध्ये, पुराणांमध्ये आणि अनेक दंतकथांमध्ये आहेत. नासाने अनेकदा यावर संशोधन सुद्धा केलं आहे. हे सरोवर उल्कापातामुळे तयार झालं आहे.

सत्तराव्या दशकात वैज्ञानिकांचं असं म्हणणं होतं की हे सरोवर ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे तयार झालं आहे. पण हे चुकिचं ठरलं. कारण जेव्हा सरोवर ज्वालामुखीपासून तयार होतं. त्यावेळी १५० मिटर खोल असतं. २०१० च्या आधीपासून असं मानलं जातं होतं की हे सरोवर ५२ हजार वर्ष जुनं आहे. पण अलिकडे केलेल्या संशोधनानुसार हे सरोवर ५ लाख ७० हजार वर्ष जुनं आहे.

लोणार सरोवराचा उल्लेख ऋग्वेदात सुद्धा आहे. या सरोवराशी निगडीत अनेक पौराणिक कथा जोडल्या आहेत. या ठिकाणी लोण नावाचा राक्षस होता. ज्याचा वध भगवान विष्णूंनी केला. या राक्षसाचं रक्त भगवान विष्णूंच्या पायाला लागलं. ते रक्त पुसण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांचा अंगठा मातीत टाकला आणि त्या जागेवर हे सरोवर तयार झाले असे अनेक समज, कथा प्रचलित आहेत.

लोणार सरोवराजवळ प्राचीन मंदिरं सुद्धा आहेत. त्यात दैत्यासुदन मंदिर सुद्धा आहे. हे भगवान विष्णू, सुर्य,दुर्गा आणि नरसिम्हाला समर्पण करण्यात आले आहे.

या सरोवरावर जवळपास ७ किलोमीटरचा परिसर आहे. हे सरोवर १५० मिटर खोल आहे. जी उल्का या परिसरात पडली ती १० लाख टन इतक्या वजनाची असू शकते. असा अंदाज वर्तवण्यात येतो.

लोणार सरोवराजवळचं उल्कापातामुळे दोन सरोवर तयार झाले होते. सध्या या बाजूचा तलाव सुकला आहे. २००६ मध्ये लोणार सरोवराच्या बाजूचा तलाव पूर्णपणे सुकला.

या सरोवराजवळ एक विहिर आहे तिचे पाणी अर्धे खारट आणि अर्धे गोड असे आहे.

त्याची बनावट आणि खजूराहोच्या मंदिराची बनावट समान आहे. या व्यतिरिक्त लोनारधर मंदिर, कमलजा मंदिर, मोठा मारुती मंदिर आहे. याची निर्मिती १००० वर्ष आधी झाली आहे.

जर तुम्हाला लोणार सरोवराला भेट द्यायची असेल तर सगळ्यात जवळचं औरंगाबाद विमानतळ आहे औरंगाबादवरून १५७ मिटरच्या अंतरावर हे आहे. सगळ्यात जवळचं रेल्वेस्टेशन जालना आहे. जालन्यापासून ९० किलोमीटरच्या अंतरावर हे सरोवर आहे.