karnika cruise world class cruise ship is a fourteen story premium cruise
7 स्टार हॉटेलपेक्षा शानदार 'कर्निका', जाणून घ्या खासियत! By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 03:03 PM2019-04-19T15:03:26+5:302019-04-19T15:10:30+5:30Join usJoin usNext जागतिक दर्जाची भारतातील पहिली शानदार क्रूज 'कर्णिका' भारतात सुरू झाली आहे. कर्णिका 14 मजल्यांची क्रूज आहे. 2 हजार 700 प्रवासी क्षमता असलेल्या या क्रूजची लांबी 250 मीटर आहे. समुद्रात तरंगणारी ही क्रूज 7 स्टार हॉटेलपेक्षाही अधिक शानदार आहे. भारतात सर्वप्रथम कर्णिका या क्रूजची सेवा ही मुंबई ते गोवा अशी सुरू झाली आहे. क्रूजवरील प्रवाशांना उत्तम सेवा-सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच सर्वच खोल्या या अत्यंत सुंदररित्या सजवण्यात आल्या असून खिडक्यांमधून दिसणारे दृश्य अप्रतिम आहे. कर्णिका क्रूजवर शॉपिंगची सुविधाही प्रवाशांना देण्यात आली आहे. यासोबतच देशी-विदेशी पर्यटकांसाठी रेस्टॉरंटमध्ये चविष्ट भोजनाची व्यवस्था आहे. क्रूजवर 24 तास सुरू असणारे एक कॉफीशॉपही आहे. मनोरंजनासाठी क्रूजवर खास कॅसिनोची व्यवस्था केलेली आहे. समुद्रात तरंगणाऱ्या या क्रूजमध्ये दोन मोठे स्विमिंग पूल देखील आहेत, ज्यात तुम्ही स्विमिंग करण्याचा अनुभव घेऊ शकतात. क्रूझमधील तरुण आणि लहान मुलांच्या मनोरंजनाचा खास विचार करण्यात आला आहे. त्यामुळे एक वॉटरपार्क तयार करण्यात आले आहे. कर्णिका ही क्रूज मुंबई-गोवा-मुंबई या मार्गावर सुरू झाली आहे. मात्र या क्रूजची सेवा ही लवकरच मुंबई, चेन्नई, विशाखापट्टणम मार्गांवर देखील उपलब्ध असेल. तसेच देशी-विदेशी पर्यटकांसाठी, सिंगापूर, दुबई आणि काही देशांत सेवा देण्यात येणार आहे. टॅग्स :ट्रॅव्हल टिप्सTravel Tips