know everything about faroe islands denmark and annual whaling
डेन्मार्कमधील सर्वात सुंदर बेट; पण दरवर्षी रक्ताने लाल होतो येथील... By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 07:47 PM2020-02-21T19:47:58+5:302020-02-21T20:04:00+5:30Join usJoin usNext युरोपमधील डेन्मार्क जगातील दुसरा सर्वात सुंदर आणि शांत देश आहे. 57 लाख लोकसंख्या असलेल्या या देशाचे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखे आहे. दरम्यान, येथील एक प्रथा पाहून आपल्याला वाईट वाटेल. या प्रथेनुसार, दरवर्षी उन्हाळ्यात समुद्र रक्ताने लाल होतो. स्कॉटलंडच्या उत्तरेस 200 मैलांवर फेरो बेट आहे. ते डेन्मार्क राज्याचा भाग आहे. या बेटाचे सौंदर्य कोणालाही आकर्षित करु शकते. डेन्मार्कचा भाग असल्यामुळे हे बेट युरोपियन युनियनमध्ये सामील झाले नाही. गेल्या वर्षी म्हणजेच 2019 मध्ये येथील लोकसंख्या जवळपास 50 हजार होती. अलीकडेच फेरो बेटाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर पर्यावरणवाद्यांनी या बेटाच्या प्रथेविरोधात आवाज उठविला. फेरो बेटावरील रहिवासी दर उन्हाळ्यात 'द ग्राइंड' नावाची ही प्रथा जपतात. या प्रथेनुसार येथील समुद्रात मासेमारी करतात. विशेष करून वेल माशांची शिकार करतात. या शिकारीमुळे समुद्राचे पाणी रक्ताने लाल होते. मीडिया रिपोर्टनुसार, 2019 मध्ये 1000 हजाराहून अधिक वेल माशांची शिकार करण्यात आली होती. या बेटावरील लोक वेल माशांचे सेवन मोठ्या प्रमाणात करतात. येथील लोक मासे उकडून, तळून किंवा कोरडे खातात. दरम्यान, या प्रथेविरोधात सतत आवाज उठविला जात आहे. बेटावरील लोक वेल मासे एकमेकांना पैशाशिवाय वाटतात. याठिकाणी मोठ्याप्रमाणात मासेमारी केली जाते. मासेमारी आणि यासंबंधीचे काम येथील लोकांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. वेल माशांच्या शिकारमुळे होत असलेला निषेध पाहून येथील लोक संतप्त झाले आहेत. बेटावरील लोक म्हणतात की, त्यांचे बहुतेक खाद्यपदार्थ माशांचेच असते. जंगल किंवा इतर स्त्रोतांच्या अभावामुळे समुद्रावर अवलंबून रहावे लागते. दरम्यान, या सुंदर बेटावर मोठ्या संख्येने पर्यटक येतात. हिरवेगार मैदान, सुंदर किनारे आणि रुचकर खाद्यपदार्थाने फेरो बेटावर आलेल्या पर्यटकांचे स्वागत होते. येथील सुंदर दृश्ये कोणालाही मंत्रमुग्ध करु शकतात. (टीप - सर्व फोटो सोशल मीडियावरून घेतले आहेत)टॅग्स :जरा हटकेट्रॅव्हल टिप्सJara hatkeTravel Tips