'या' देशांच्या ध्वजांमागचे कारण माहिती आहे का? जाणून घ्या कशाचे प्रतीक आहेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 05:06 PM2020-02-08T17:06:50+5:302020-02-08T17:20:28+5:30

जगात एकूण १९७ देश आहेत. त्यातील १९३ मान्यता प्राप्त आहेत. या सगळ्या देशांना स्वतःचे ध्वज आहेत. भारताच्या तिरंग्यात जसा वेगवेगळ्या गोष्टींचा अर्थ दडला आहे. त्याचप्रमाणे इतर देशांच्या झेंड्यामध्ये सुद्धा खास अर्थ आहे. देशाचे प्रतिबिंब देशाच्या ध्वजात दिसत असतं. आज आम्ही तुम्हाला विविध देशांच्या ध्वजामागची संकल्पना काय आहे याबाबात सांगणार आहोत. नेपाळच्या झेंड्यात दोन त्रिकोण आहेत. जे माऊंट एव्हरेस्टचे प्रतिक आहे. या झेंड्यावर चंद्र आणि सुर्य सुद्धा आहेत. ज्यातुन असं दिसून येतं की यानंतर सुद्धा नेपाळचे अस्तित्व टिकून राहिल.

स्वित्झलॅंडच्या ध्वजात एक प्लसचे चिन्ह आहे. जे रेड क्रॉस समाजाचे प्रतिक दर्शवतात. याची स्थापना स्विस नागरीक Henry Dunant याने केली.

फिलिपिंस हा एकमेव देश आहे. ज्या देशात युध्दकाळात आपला ध्वज वारंवार बदलला जातो.

भूटानच्या झेंड्यात एक ड्रॅगन आहे. तिबेटीयन भाषेत या देशाचे नाव आहे.

कॅनडाचा ध्वज १९६५ मध्ये स्विकारण्यात आला होता. ज्यात एका झाडाचे पान दर्शवले आहे.

कतार या देशाचा झेंडा सगळ्यात लांब आहे. याची लांबी आणि उंची ११: २८ आहे.

डेनमार्कचा ध्वज हा सगळ्यात जूना आहे. इतिहासकारांच्यामते चौदाव्या शतकापासून हा ध्वज वापरला जात आहे.

जमॅका या देशाच्या ध्वजात काळा, पिवळा आणि हिरवा रंग आहे. इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ६ ऑगस्ट १९६२ ला या ध्वजाचा स्विकार करण्यात आला .