long weekend trip best places to visit under budget in india
'या' सुंदर ठिकाणांची करा सैर; ताण-तणाव होईल दूर By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 04:38 PM2019-08-12T16:38:54+5:302019-08-12T16:51:02+5:30Join usJoin usNext कामातून विश्रांती मिळावी म्हणून फिरण्याचा बेत आखला जातो. सध्या पावसाळा सुरू असून निसर्ग हिरवाईने नटलेला आहे. कमी खर्चात कोणत्या ठिकाणी जाऊ शकता हे जाणून घेऊया. अमृतसर अमृतसर येथील सुवर्ण मंदिर प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे फिरायला जाण्याचा नक्की विचार करता येईल. यासोबतच जालियनवाला बाग, दुर्गियाना मंदिर, रामतीर्थ यासारख्या काही ठिकाणांना ही भेट देता येईल. महाबळेश्वर महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेले महाराष्ट्रातील एक लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण आहे. निसर्गाच्या कुशीत हॉटेल, रिसॉर्टच्या माध्यमातून राहण्याचीही उत्तम सोय असल्याने कुटुंबासह सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहेउत्तराखंड उत्तराखंड हे भारताच्या उत्तरेकडील महत्वाचे राज्य असून देवभूमी या नावाने सुद्धा ओळखले जाते. केदारनाथ, बद्रिनाथ, हरिद्वार, ऋषिकेश ही येथील प्रसिद्ध धार्मिक स्थळं आहेत.हरियाणा फिरण्यासाठी हरियाणा हे देखील एक उत्तम ठिकाण आहे. अनेक पर्यटक या ठिकाणाला भेट देत असतात.राजस्थान राजस्थानला एकदा पावसाळ्यात नक्की भेट द्या. येथील सरोवरांमधील स्वच्छ पाणी आणि आभाळातून कोसळणाऱ्या पावसाच्या धारा तुम्हाला खरचं प्रसन्न करतील.कुर्सेओंग दार्जिलिंगपासून जवळपास 30 किलोमीटर अंतरावर कुर्सेओंग असं सुंदर ठिकाण आहे. हे एक लोकप्रिय थंड हवेचं ठिकाण असून अनेक पर्यटक येथे भेट देत असतात. टॅग्स :ट्रॅव्हल टिप्समहाबळेश्वर गिरीस्थानराजस्थानहरयाणाTravel TipsMahabaleshwar Hill StationRajasthanHaryana