-अमृता कदमएप्रिल-मे महिन्यात फिरायला जायचंय, खूप मोठी सुटी नाहीये अगदी सहा-सात दिवसांचाच वेळ आहे अशावेळी नेमकी कुठे आणि कशी ट्रीप प्लॅन करायची असा प्रश्न पडू शकतो. शुभ्र; खळाळती नदी, हिमाच्छादित शिखरं, गर्द हिरवाईतल्या पायवाटेनं मारलेला फेरफटका...हा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही मनालीला चार दिवसांची सहल नक्कीच काढू शकता.खरं तर मनालीला थंडीमध्ये जाणं केव्हाही चांगलं, असं अनेक जण तुम्हाला सांगतील, सुचवतील. कारण इथलं प्रमुख आकर्षण म्हणजे हिमवृष्टी. पण तरीही बर्फ वितळण्याच्या या काळातही मनालीचं सौंदर्य उणावत नाहीच, पण उन्हाच्या रखरखाटापासून शांत विसावाही मिळतो. शिवाय याच काळात इथे वेगवेगळ्या स्नो आणि वॉटर स्पोर्टसचाही आनंद घेता येतो.मनालीमध्ये चार दिवस तुम्ही काय काय पाहा हे सांगण्याआधी एक महत्त्वाची सूचना. मनालीमध्ये पायीच फिरा. इथल्या हवेशी, निसर्गाशी एकरु प होऊन त्याचा आनंद घ्यायचा असेल तर एसी गाडीच्या खिडकीमधून मनाली दर्शन अजिबात करु नका. पहिला दिवसमनालीमधला पहिला दिवस तुम्ही जी स्थानिक पर्यटनस्थळं आहेत, ती पाहण्यात अगदी आरामात घालवू शकता. इथे तुम्हाला हिडंबा देवीचं मंदिर पहायला मिळतं. महाभारतातल्या गोष्टींमधून राक्षसीण आणि भीमाची बायको म्हणूनच आपल्याला माहित असलेल्या हिडंबेला मनालीमधले लोक मात्र मानतात. त्यामुळेच तिचं अतिशय सुंदर असं मंदिर इथे आहे. हिडंबा मंदिरानंतर पाईन वृक्षांची वनराजी असलेल्या नेचर पार्कमध्ये निवांतपणे फेरफटका मारु शकता. हा अनुभव आपल्याला आतून-बाहेरु न शांत करू शकतो.इथला मॉल रोड शॉपिंगसाठी अतिशय प्रसिध्द आहे खरा; पण तुम्हाला खरेदीची फार आवड नसेल, तर इथे वेळ घालवू नका. कारण इतर अनेक शॉपिंग स्ट्रीट प्रमाणेच ही जागाही आहे...फक्त थोडी अधिक मोठी आणि गजबजलेली आहे इतकंच .बियास नदीवर रिव्हर क्र ॉसिंगचा आनंदही घेतलाच पाहिजे. इथला हा खेळ काही फार धोक्याचा नाही.दुसरा दिवसमनाली ट्रिपमधला दुसरा दिवस तुम्ही सोलांग व्हॅली आणि बियास नदीसाठीच राखून ठेवू शकता. मनाली शहरापासून अवघ्या अधर््या तासाच्या अंतरावर सोलांग व्हॅली आहे. मित्रमैत्रीणींच्या ग्रुपसोबत ट्रीप काढली असेल तर तुम्ही भाड्यानं बाइकही घेऊ शकता. कारण या अधर््या तासाच्या प्रवासातही तुम्हाला वरचेवर थांबून फोटो काढण्याचा मोह होऊ शकतो.इथे भरपूर बर्फअसल्यानं पाय घसरण्याची पण शक्यता असते. त्यामुळेच इथे प्रवाशांसाठी गंबूटही भाड्यानं मळतात. सोलांग व्हॅलीमध्ये भरपूर स्नो स्पोर्टस खेळायला मिळतील. स्कीइंग, स्लेजिंग, पॅराग्लायिडंग, आइस स्कूटरमधून फेरी असे वेगवेगळे खेळ तुम्ही खेळू शकता.परत येताना गाडी पार्ककरु न निवांतपणे बियास नदीच्या काठावर बसून रहा. बियासच्या शुभ्र आणि थंड पाण्यात खेळण्याचा अनुभव निव्वळ अविस्मरणीय असेल. तिसरा दिवसइथले जोगिनी फॉल्स बघण्यासाठी तुम्ही एक दिवस हाताशी ठेवायलाच हवा. या दोन धबधब्यांपैकी पहिल्या धबधब्यापर्यंत पोहचायला वेळ लागत नाही. पण पहिल्या धबधब्यापासून दुसऱ्या धबधब्यापर्यंत चढत जायला चार तास लागतात. त्यामुळे तुम्ही जितक्या लवकर सुरु कराल, तितकं चांगलं. शिवाय चढताना पायात चांगले शूज असावेत आणि सोबत पाण्याची बाटली, बिस्किटं, एखाद-दुसरं फळंही असलेलं चांगलंच!चौथा दिवसमनालीतला हा शेवटचा दिवस पुन्हा शहरातील भटकंतीसाठी राखून ठेवता येईल. यावेळेस पर्यटनस्थळांना भेटी देण्याच्या ऐवजी तुम्ही मनालीतल्या जुन्या कॅफेमध्ये रेंगाळू शकता. जॉन्सन्स, कॅफे 1947, ड्रिफ्टर्स आणि जर्मन बेकरीला आवर्जून भेट द्या.मनालीला कसं जाल?मनालीला जायचं असेल, तर दिल्लीवरु न जाता येतं. दिल्लीवरु न हिमाचल परिवहन मंडळाच्या बसेस सुटतात. अजून जवळचा पर्याय म्हणजे चंदीगढवरु न मनालीला जाण्याचा. तुमच्या सोयीनुसार तुम्ही कुठून जायचं ते ठरवू शकता.मनालीला गेल्यावर काय पहायचं, याचा हा साधारण आराखडा. अर्थात तुमच्या आवडी आणि सवडीनुसार तुम्ही तुमची वेगळी लिस्ट नक्कीच बनवू शकता.