Mandu city special trip of butterfly park in madhya pradesh
तितली पार्कचे मनमोहक सौंदर्य बघाल तर प्रेमात पडाल, नक्की द्या भेट! By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 05:46 PM2020-01-28T17:46:33+5:302020-01-28T18:01:46+5:30Join usJoin usNext मध्यप्रदेशातील धार जिल्ह्यात एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी हजारो पर्यटक पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. मांडू म्हणडेच मांडवगढ असं या पर्यटनस्थळाचे नाव आहे. या ठिकाणाला तितली पार्क असं सुद्धा म्हणतात. या ठिकाणचे रंगेबीरंगी फुलपाखरू प्रमुख आकर्षण आहे. या ठिकाणच्या राज्य वन विभागाने सुप्रसिध्द फुलपाखरांचे पार्क ८० लाख रूपये खर्च करून तयार केले आहे. या पार्कचं नाव जमुनादेवी तितली पार्क असं आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं दिसण्यासोबतच १०० वेगवेगळ्या प्रकरचे फुलपाखरांच्या प्रजाती सुद्धा पाहता येणार आहेत. या ठिकाणी पर्यटनाच्या उत्तमोत्तम सुविधा दिल्या जाणार आहेत. हे पर्यटन स्थळ बाज बहादुर आणि रानी रूपमति यांच्या प्रेमाचे प्रतिक मानलं जातं. या ठिकाणी पर्यटकांचा ओढा वाढवण्यासाठी तसंच व्यवसाय विकसीत करण्यासाठी हे पर्यटन स्थळ विकसीत करण्यात येणार आहे. फुलपाखरं ही नेहमीचं मनाला आनंद देणारी असतात. त्यामुळे फुलपाखरांच्या वेगवेगळ्या प्रजाती पाहण्यासाठी या पार्कची निर्मीती करण्यात आली. टॅग्स :ट्रॅव्हल टिप्सTravel Tips