दिल्ली एअरपोर्टवर प्रवासी विसरलेयत अशा वस्तू ज्या पाहुन तुम्ही तुमच्या डोक्याला हात लावाल By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 05:47 PM 2022-04-13T17:47:31+5:30 2022-04-13T18:28:07+5:30
जर विमानतळावर कोणी एखादी वस्तू विसरून तसाच निघून गेला, तर त्या वस्तू ज्याच्या त्याला परत मिळण्यासाठी खास व्यवस्था दिल्ली विमानतळानं केली आहे. अशा विसरलेल्या किंवा हरवलेल्या वस्तू सापडल्यास त्या वस्तूंची यादी विमानतळाच्या वेबसाईटवर जाहीर केली जाते. ती यादी वाचून लोक काय काय विसरू शकतात, याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. दिल्ली विमानतळावर असंख्य प्रवाशांच्या विसरलेल्या वस्तूंची यादी जाहीर झाली आहे. यात अनेक सामान्य आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह बेल्ट, लॅपटॉप, फोन, काही रोख रक्कम या स्वरूपात लोकांनी त्यांच्या वैयक्तिक वस्तू विसरलेल्या आहेत.
प्रवासात वस्तू हरवल्यास त्यामुळे मनस्ताप तर होतोच. शिवाय, एखादी महत्त्वाची वस्तू राहून गेल्यास त्यामुळं काही महत्त्वाची कामंही अडून बसू शकतात. यासाठी आपल्या वस्तू सांभाळून काही वेळा त्रास होऊ शकतो.
दिल्ली विमानतळानं आता या समस्येवर तोडगा काढला आहे. त्यांच्या वेबसाइट तुम्हाला त्यांच्या वेबसाइटवर तुमच्या हरवलेल्या वस्तूंचा शोध घेता येतो.
प्रवासाला निघताना मोजक्या आणि आवश्यक वस्तूच केवळ सोबत ठेवल्या पाहिजेत. भरपूर सामान सोबत घेतल्यामुळं वस्तू विसरण्याच्या किंवा हरवण्याच्या घटना घडतात. कधी हे सामान सापडतं तर कधी नाही.
दिल्ली विमानतळानं उपलब्ध केलेल्या या सुविधेचा वापर करून तुम्ही तुमच्या इथं विसरलेल्या वस्तू परत मिळवू शकता.
ही सुविधा सुरू झाल्यापासून काही लोकांनी सोशल मीडियावर ही 'विसराळू लोकांची गंमत पाहण्याची संधी' असल्याचं म्हटलं आहे. विविध ठिकाणचे विसराळू कोणकोणत्या वस्तू विसरू शकतात, हे इतर लोकांना विमानतळाच्या वेबसाईटवरून समजणार आहे.
यामुळं गंमत म्हणून ही यादी वाचण्याचा आनंदही लोक घेऊ शकतील. याचा आता ट्विटर थ्रेड बनला आहे आणि सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
एखाद्या विशिष्ट तारखेला विसराळू लोकांनी काय विसरलंय हे समजू शकतं. यावरून @MumbaiCentral या ट्विटर वापरकर्त्याने याबद्दल एक ट्विट केलं आहे. काहींनी या यादीचा फोटोही शेअर केला आहे.
एखाद्या विशिष्ट तारखेला विसराळू लोकांनी काय विसरलंय हे समजू शकतं. यावरून @MumbaiCentral या ट्विटर वापरकर्त्याने याबद्दल एक ट्विट केलं आहे. काहींनी या यादीचा फोटोही शेअर केला आहे.
विमानतळाच्या अधिकृत वेबसाइटवर आम्हाला आढळलेल्या गोष्टींची यादी येथे आहे, ज्या प्रवाशांनी राजधानी दिल्लीतच्या विमानतळावर विसरल्या आहेत. यामध्ये आंब्याच्या पेटीपासून ते मिक्सर ग्राइंडर, टॉर्च आणि बांगड्यांचाही समावेश आहे.
वेबसाइटवर सूचीबद्ध केलेल्या इतर अनेक सामान्य आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंसह असंख्य प्रवाशांनी त्यांच्या वैयक्तिक वस्तू जसे की बेल्ट, लॅपटॉप, फोन, काही रोख रक्कम देखील मागे ठेवल्या आहेत.
काही लोकांनी कमेंट सेक्शनमध्ये स्वतः विसरलेल्या वस्तूंबद्दलचे अनुभवही सांगितले आहेत. एका व्यक्तीनं लिहिलं, "मी माझी हरवलेली वस्तू यादीत आहे. परंतु, ती 'वेअरहाऊस'मध्ये 5 दिवसांहून अधिक काळ असल्यानं, काही महिन्यांत तिचा लिलाव होणार आहे."