उन्हाळ्यात ईशान्य भारत फिरण्यास आहे छान, मिळणार शांती अन् समाधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 03:00 PM2019-05-04T15:00:52+5:302019-05-04T15:13:07+5:30

उन्हाळ्यात फिरण्याचा प्लॅन करताय, तर एकदा तरी ईशान्य भारताला आवर्जून भेट द्या. ईशान्य भारतात सात प्रदेश येतात. ते फारच सुंदर आहेत. तसेच त्यांना सेव्हन सिस्टर या नावानंही ओळखलं जातं. ईशान्य भारतातील पर्वत, धबधबे पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे.

पेलिंग- सिक्कीममधलं पेलिंग हे सुंदर घाटी आणि पर्वतांसाठी प्रसिद्ध आहे. इथे दूरदूरपर्यंत नयनरम्य दृश्य पाहायला मिळतं. पेलिंगवरून आपल्याला कंचनजंगा, काबुरो आणि हिमालयाच्या पर्वतरांगा पाहायला मिळतात.

गंगटोक- सिक्कीमची राजधानी गंगटोकही फार सुंदर आहे. सिक्कीमला जाण्यासाठी बागडोगरा विमानतळावर उतरावं लागेल. इथून गंगटोक 124 किलोमीटरवर आहे.

बागडोगराला आपण ट्रेननंही जाऊ शकता. गंगटोकचं सौंदर्य पाहून डोळ्यांची पारणं फेडतात. इथे फारच शांतता असते.

शिलाँग- मेघालयातील शिलाँगला देश-विदेशातील पर्यटक भेट देतात. पर्वतावर वसलेलं हे आकर्षक ठिकाण एकेकाळी आसामची राजधानी होती. परंतु विभाजनानंतर मेघालयामध्ये ते सामील झालं. शिलाँगमध्ये वातावरण नेहमीच आल्हाददायक असते. कुटुंबासोबत फिरण्यासाठी हे ठिकाण बेस्टच आहेत.